मुंबई : नरगिस फाखरी कोरोना काळात अमेरिकेत राहत होती. यावेळी ती बॉलिवूड पासून दुरावली होती. तेव्हा ती जुन्या मैत्रिणी इलियाना डिक्रूझ, हुमा कुरेशी आणि वरुण धवनसोबत घालवलेल्या क्षणांना आठवायची. बॉलिवूडसुद्धा तिला विसरू शकत नाही कारण तिचे बोल्डनेस खरोखरच चाहत्यांची मनं जिंकणारं होतं.
ज्यांनी-ज्यांनी तिचा पहिला चित्रपट 'रॉकस्टार' मध्ये तिच्या अभिनयावर टीका केली त्यांनी सुद्धा कबूल केलं की, तिचा प्रत्येक लुक मंत्रमुग्ध करणारा होता. पण तुम्हाला माहीत आहे का की, नर्गिस उदय चोप्रासोबत बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती. आता तिने या नात्याबद्दल तिने स्वत: सांगितलं आहे की, तिला याबद्दल खंत आहे. त्याचबरोबर रणबीर कपूरसोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्यांवरही तिने मौन सोडलं होतं.
पूर्ण झाली 10 वर्षे, अशाप्रकारे रॉकस्टारमध्ये मिळाली भूमिका
बॉलिवूडमध्ये तिला 10 वर्षे पूर्ण झाल्यावर, नर्गिस फाखरी म्हणाली की, हा एक अद्भुत प्रवास होता. तिने 'रॉकस्टार' या तिच्या पहिल्या चित्रपटातून नाव कमावल्यानंतर तिनं सांगितलं की, ही एक मोठी कथा आहे, मला एका ऑडिशनबद्दल मेल पाठवण्यात आला होता. मी खरोखर विश्वास ठेवते की, हे माझं भाग्य आहे. मी भारतात कधीच आली नव्हती. आणि कधी राहिली देखील नव्हते. पण यानंतर मी जे ऐकलं होतं त्यानुसार इम्तियाजने माझ्या एका दागिन्यांच्या मोहिमेसाठी जाहिरात पाहिली होती, जी मी ग्रीसमध्ये असताना शूट केली होती. मला वाटतं त्यांनी त्या कंपनीकडून माझी माहिती घेतली आणि ऑडिशनसाठी माझ्याशी संपर्क साधला.
दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आणि उदय चोप्राच्या लव्हस्टोरीबद्दल नर्गिस फाखरी म्हणाली की, उदय आणि मी 5 वर्षे ऐकमेकांना डेट करत होतो आणि तो मला भारतात भेटलेला सर्वात सुंदर व्यक्ती होता. मी मीडियाला हे कधीच सांगितलं नाही, कारण लोकांपासून मला माझं नातं गुप्त ठेवायला सांगितलं होतं, पण मला याची कायम खंत वाटते. कारण मी डोंगराच्या कडेवरून ओरडायला हवं होते की, मी इतक्या सुंदर स्वभावाच्या व्यक्तीसोबत आहे.
रणबीर कपूरसोबतचं अफेअर उघड!
'रॉकस्टार' चित्रपटादरम्यान नर्गिसने रणबीर कपूरसोबतच्या नात्याबद्दल खुलासाही केला. ती म्हणाली, मी आभारी आहे की, मी रणबीरसोबत माझा पहिला सह-कलाकार म्हणून काम केलं. तो एक अद्भुत अभिनेता आहे आणि त्याच्याबरोबर काम करणं सोपं आहे. तसंच तिच्या आईला ओळखणं हे देवाच्या आशीर्वादासारखं होतं कारण ती माझ्यासाठी खूप प्रिय आहे. त्यावेळी तिला माझ्या आयुष्यात येणं खरोखरच सूकुन देणारं होतं. कारण मी भारतात एकटीच होते.