Raj Kapoor: बॉलिवूडमध्ये एक दशक असा होता जेव्हा एका कलाकाराचं पूर्ण इंडस्ट्रीवर राज्य होत आणि ते म्हणजे 'राज कपूर'. त्यांचा प्रत्येक चित्रपट थिएटरमध्ये लागताच हिट होणार हे नक्की होतंं. राज कपूर यांच्या दमदार दिग्दर्शनात बनलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमालीची जादू केली होती. भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर नेण्यात राज कपूर यांचं खूप मोठं योगदान आहे.
राज कपूर यशाच्या शिखरावर होते. त्यांचा प्रत्येक सिनेमा सुपरहिट ठरत होता. पण एक चित्रपट असा होता ज्याला दर्शकांनी नापसंत केलं. चित्रपटाचं नाव होतं 'मेरा नाम जोकर'. राज कपूर यांनी हा सिनेमा बनवण्यासाठी खूप खर्च केला होता. हा चित्रपट फ्लॉप झाल्याने त्यांना मोठं नुकसान झेलावा लागला. त्यानंतर एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी 'बॉबी' हा चित्रपट बनवला आणि 'बॉबी' हा त्या वर्षाचा सर्वात गाजलेला चित्रपट ठरला. याची गाणी सुद्धा खूप गाजली होती.
राज कपूर यांनी त्यावेळी चित्रपटात दोन नवे चेहरे आणले. त्यांनी स्वतःचा मुलगा ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimpal Kapadiya) यांना चित्रपटात मुख्य कलाकार म्हणून कास्ट केले. डिंपल कपाडियाच्या वडिलांच्या भूमिकेसाठी प्रेमनाथ यांची निवड झाली. अलीकडे एका मुलाखतीत प्रेमनाथ यांचा मुलगा मॉन्टी नाथने या चित्रपटाचा एक किस्सा सांगितला होता. मॉन्टीनाथने खुलासा केला की 'पटकथेचा क्लाइमॅक्स वेगळा होता, ज्यात डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांच्या प्रेमाची happy ending होत नाही. क्लाइमॅक्समध्ये दोघे डोंगरावर जातात आणि पाण्यात उडी मारतात. दोघे शेवटी मरणार असा सीन होता'.
वडिलांनी राज कपूर यांना चित्रपटाचा शेवट दु:खद न दाखवता आनंदी दाखण्याचा सल्ला दिल्याचं मॉन्टीने सांगितले. ऋषी कपूरची 'चिंटू' ही भूमिका जिवंत असल्याची दाखवावी तसेच प्राणसाहेब डिंपलला वाचवतील असे दाखवावे हे प्रमनाथ यांचे मत होतं. वडीलांची भूमिका साकारत असलेले कलाकार आपल्या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारतात आणि नंतर सगळे एकत्र येतात असं आनंदाचं चित्र प्रेमनाथांनी आपल्या मनात तयार केलं होतं.
पुढे त्यांच्या वडिलांनी याबाबतचा निर्णय राज कपूर यांच्यावर सोपवल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "माझ्या वडिलांनी या सल्ल्यानंतर राज कपूर यांना या जहाजाचे कप्तान असं संबोधलं होतं. तसेच ते राज कपूर यांना म्हणाले की तुम्ही या चित्रपटाला तुमच्या पद्धतीने शूट करा. आम्ही सगळे कलाकार लोकेशनवर उपस्थित असणार, तुम्ही एडिटिंगच्या वेळी तुमचा निर्णय घेऊ शकता."
एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी 'बॉबी' चित्रपट बनवण्यामागचं कारण सांगितलं होतं. म्हणाले की "मला लॉन्च करण्यासाठी नाही तर 'मेरा नाम जोकर'साठी घेण्यात आलेल्या कर्जाला फेडण्यासाठी त्यांनी (राज कपूर) 'बॉबी' चित्रपट बनवला होता". अपेक्षेप्रमाणे 'बॉबी'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.