नव्या नवेली नंदाने केलं आराध्या बच्चनविषयी मोठं विधान; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

बीग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी आराध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. 

Updated: Feb 26, 2024, 02:53 PM IST
नव्या नवेली नंदाने केलं आराध्या बच्चनविषयी मोठं विधान; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा एक्टिंगमध्ये करिअर न करता स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ती 'वॉट द हेल (What the Hell Navya Vodcast) या नव्या वॉडकास्टची होस्ट आहे. सोबतच ती काही स्टार्टअप प्रोजेक्टवरही काम करत आहे. एका मीडिया हाऊससोबत बोलताना तिने आराध्या बच्चनचं कौतुक केलं नव्याने सांगितलं की, आराध्या आपल्या वयाच्या हिशोबाने खूपच समजूतदार आहे. ती म्हणाली की मी देखील वयाच्या 12 व्या वर्षीही ती इतकी हुशार नव्हती.

आराध्या बच्चनचं केलं खूप कौतूक
नव्या नवेली नंदाच्या  वॉडकास्ट What The Hell Navya चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये ती आई श्वेता आणि आजी जया बच्चनसोबत वेग-वेगळ्या मुद्द्यांवर बोलताना दिसत आहे. यावेळी तिचा भाऊ अगस्त्य नंदादेखील चर्चेचा विषय बनला होता. वॉडकास्टमध्ये अद्यापतरी ऐश्वर्या राय दिसली नाहीये. प्रेक्षकांच सतत डिमांड करत आहेत की, नव्याने एका मीडिया हाऊससोबत बोलताना अभिषेक-ऐश्वर्याची मुलगी आराध्याचं कौतुक होताना दिसत आहे.

न्यूज शोशामध्ये नव्याने सांगितलं आहे की, ती आराध्याला कसालाच सल्ला देत नाही कारण ती स्वत:च इतकी समजूतदार आहे. नव्या म्हणाली, मला माहिती नाही की, मी तिला सल्ला दिला पाहिजे की, नाही मात्र मला वाटतं की, मी जेव्हा १२ वर्षांची होती तेव्हा मी तिझ्या इतकी समजूतदार नव्हते. ती खूप हुशार आहे आणि मला असं वाटतं की, कदाचित तिच्या वयात मला इतक्या गोष्टी माहितीच नव्हत्या जितक्या तिला माहिती आहेत. , त्यामुळे संपूर्ण पिढी जगातील गोष्टींबद्दल अशा समजुतीने मोठी होत आहे हे पाहणं खूप छान आहे. त्यामुळे मी तिला काय सल्ला देणार.

खूप हुशार आहे आराध्या
नव्या म्हणाली, मला असं वाटतं की, इतक्या कमी वयात तिला खूपच समज आहे. ती खूप हुशार आहे. मी खूप खुश आहे की, घरात एक छोटी बहिण आहे जिला मी माझ्या मानातल्या गोष्टी तिच्यासोबत शेअर करु शकते पण मला असं खरंच वाटत नाही की, मी तिला कसला सल्ला दिला पाहिजे कारण तिला माझ्या सल्ल्याची गरज नाही. ती खूप कॉन्फिडन्ट आहे.  हे खूप कौतुकास्पद आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x