बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याच्या बहिणीचं निधन

18 व्या वर्षी झाला होता कॅन्सर 

Updated: Dec 7, 2019, 03:43 PM IST
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याच्या बहिणीचं निधन

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवाजुद्दीनची बहिण सायमा तमशी सिद्दकीचं निधन झालं आहे. अवघ्या 26 वर्षांच्या सायमाचं निधन झालं आहे. शनिवारी सायमाचं मुंबईतील एका रूग्णालयात निधन झालं आहे. बहिणीच्या निधनाची बातमी नवाजुद्दीनचा लहान भाऊ अयाजुद्दीन सिद्दीकीने दिली आहे. 

बहिणीचं निधन झालं तेव्हा अभिनेता नवाजुद्दीन कामानिमित्त अमेरिकेत होता. सायमाला ब्रेस्ट कॅन्सर होता. वयाच्या 18 व्या वर्षी सायमाला आपल्या आजाराबद्दल समजलं होतं. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. नवाजुद्दीनने गेल्यावर्षी सोशल मीडियावर आपल्या बहिणीला कॅन्सर झाल्याचं सांगितलं होतं. 

नवाजुद्दीनच्या बहिणीवर अंतिम विधी बुढाना उत्तर प्रदेश येथे होणार आहे. भाऊ पुण्याहून उत्तर प्रदेशला निघाला आहे. जिथे त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित आहे. यावेळी नवाजुद्दीनचे दोन भाऊ दिग्दर्शक शमास नवाब सिद्दीकी आणि वकिल हाजी अलमाजुद्दीन सिद्दीकी देखील पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 8 वाजता अंतिम विधी होतील.