'सीडीआर' प्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलाला अटक

अवैध सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) प्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचे वकील रिझवान सिद्दीकी यांना मुंबईत अटक केलीय. 

Updated: Mar 17, 2018, 11:14 AM IST
'सीडीआर' प्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलाला अटक title=

मुंबई : अवैध सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) प्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचे वकील रिझवान सिद्दीकी यांना मुंबईत अटक केलीय. 

प्रसिद्ध गुप्तहेर रजनी पंडित यांच्यानंतर मोठी कारवाई म्हणून रिझवान सिद्दीकी यांच्याकडे पाहिलं जातंय. आपल्या या अटकेवर, २३ फेब्रुवारीला जबाब नोंदवूनही कोणतीही नोटीस न देता अट केली, असा खुलासा रिझवान सिद्दीकी यांनी केलाय.

रिझवान सिद्दीकी यांची चौकशी करुन कोर्टात नेण्यात येईल असं गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

काय आहे प्रकरण?
चुकीच्या पद्धतीनं फोन कॉल्स रेकॉर्ड करून संभाषण लीक करण्यासंबंधात रिजवान सिद्दीकी यांना अटक करण्यात आलीय. 

नवाजुद्दीनच्या सांगण्यावरून कथित आरोपी डिटेक्टिव प्रशांत पालेकर यांच्या माध्यमातून नवाजुद्दीनची पत्नी पत्नी आलिया सिद्धिकीचे फोन रेकॉर्ड काढले होते, असा आरोप रिझवानवर करण्यात आलाय