Nayanthara Vignesh Wait in Line for 30 Mins Outside Restaurant : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन हे दोघं गेल्या बऱ्याच दिवसांपासून नयनताराच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या डॉक्युमेन्ट्रीमुळे चर्चेत आहे. नुकताच त्या दोघांनी नयनताराचा वाढदिवस थोड्या हटके स्टाईलमध्ये साजरी केला. त्या दोघांनी दिल्लीच्या एका लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेतला. पण यावेळी त्यांनी कोणत्याही सेलिब्रिटी सारखं नाही तर सर्वसामान्य लोकांसारखं रांगेत उभं राहूण जेवण केलं. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्या दोघांना कोणी ओळखलं देखील नाही. विग्नेशनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विग्नेनशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दोघं कनॉट प्लेसच्या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये सर्वसामान्यांप्रमाणे जेणवाचा आनंद घेताना दिसले. या रेस्टॉरंटमध्ये वेटिंगमध्ये लोकांनी जिथे रांग लावली होती. त्या रांगेत विग्नेश आणि नयनतारा देखील अर्धातास प्रतीक्षा करत होते. तर ते सर्वसामान्य लोकांसोबत बसून जेवताना दिसले. तरी देखील त्यांना कोणी ओळखलं नाही. विग्नेश आणि नयनतारा सगळ्यात आधी जुळ्या मुलांसोबत दिल्लीच्या कुतुब मीनारच्या इथे गेले होते. त्यानंतर दोघांनी दिल्लीमध्ये सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट कोणतं आहे हे शोधलं आणि तिथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी लाइनमध्ये प्रतीक्षा केली आणि पायऱ्या चढतात आणि गर्दी असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसतात.
हा व्हिडीओ शेअर करत विग्नेशनं कॅप्शन लिहिलं की '17 नोव्हेंबर, इतक्या वर्षांमधला हा अगदी साधारणपणे वाढदिवस साजरा केला. दिल्लीमध्ये वाढदिवसाची संध्याकाळ अशी साजरी केली, पर्सनल आणि इंटीमेट आणि खूप चविष्ठ. आम्ही दोघं 30 मिनिटं लाइनमध्ये उभे होतो आणि मग एक चांगला सेंटर टेबल मिळाला. धन्यवाद एका अनोळखी व्यक्तीला ज्यानं हा व्हिडीओ शूट केला.'
हेही वाचा : 'मी दुसऱ्या कोणासह...', लग्नावर स्पष्ट वक्तव्य अन् अमिताभ यांच्यासोबतच्या नात्यावर बोलताना रेखा भावूक
दरम्यान, विग्नेशनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'असं वाटतंय की जे लोकं हॉटेलमध्ये बसले आहेत त्यांनी जवान चित्रपट पाहिला नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'नयनताराचं लक्ष कळत-नकळ कॅमेऱ्याकडे येतंय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की नयनतारानं नवऱ्यासोबत अशा पब्लिक प्लेसमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला.' लोकांनी हे देखील सांगितलं की 'तिथे कोणी नयनताराला ओळखत नव्हतं, हे हसू येण्यासारखं आहे.' तर एक नेटकरी म्हणाला, 'तिथे बसलेले त्यांचेच लोक असतील आणि कॅमेरामन असतील.'