NCB कडून दीपिकाच्या मॅनेजरला पुन्हा समन्स

सर्वप्रथम ऑक्टोबर महिन्यात एनसीबीने करिश्माला समन्स जारी केले होते.  

Updated: Nov 2, 2020, 01:21 PM IST
NCB कडून दीपिकाच्या मॅनेजरला पुन्हा समन्स

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यामध्ये अनेक बड्या कलाकारांची नावे देखील समोर आली आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash)चं देखील ड्रग्स प्रकरणी नाव समोर आलं आहे. त्यामुळे दोघींना NCB कडून समन्स जारी करण्यात आला. मात्र करिश्माला समन्स पाठवल्यानंतर देखील ती चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही. म्हणून तिला पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आला आहे. आता NCBने तिची आई मिताक्षरा पुरोहित आणि क्वान टॅलेंट मॅनेजरकडे समन्स पाठवले आहे. 

करिश्माने तिच्या आईचा पत्ता दिल्याने एनसीबीने करिश्माच्या आईला समन्स पाठविले आहे. करिश्मा क्वान टॅलेंट कंपनीमध्ये काम करत होती. क्वान कंपनीत ती काम करत असल्यामुळे कंपनी तिला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सुचित करेल म्हणून कंपनीकडे देखील समन्स पाठविले आहे.

ऑक्टोबर महिन्यात एनसीबीने करिश्माला समन्स जारी केले होते. परंतु ती चौकशीसाठी हजर राहिली नाही. ती अद्यापही गायब आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आत्महत्या प्रकरणी सध्या एनसीबी तपास करत आहे. चौकशीसाठी करिश्माला समन्स पाठवण्यात आले आहे. मात्र ती गायब आहे. असं एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे.