Neena Gupta ने कपिल शर्मा शोमध्ये सगळ्यांसमोर दिलं अश्लील उत्तर

 द कपिल शर्मा शोमध्ये पंगा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना राणौतसोबत निना पोहचली होती. 

Updated: Dec 6, 2021, 08:39 PM IST
Neena Gupta ने कपिल शर्मा शोमध्ये सगळ्यांसमोर दिलं अश्लील उत्तर

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता,  ती जे काही बोलते  ते सगळे बिनधास्तपणे बोलते. त्याचा परिणाम काहीही असो. कोणाला काही वाटू देत याकडे ती कधीच लक्ष देत नाही. तुम्ही तिच्या आयुष्यात काय काय घडलंय हे पाहिलं तर, तिने संपूर्ण समाजाशी भांडण करून लग्न न करताच मुलीला जन्म दिला आहे. मोठ्या  ब्रेकनंतर गजराज रावसोबतच्या 'बधाई हो' या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड तोडले.

त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. द कपिल शर्मा शोमध्ये पंगा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना राणौतसोबत निना पोहचली होती. त्यावेळी तिने कपिलच्या एका प्रश्नाला रोखठोक  उत्तर दिलं होतं की, ते व्हायरल झालं होतं. कपिलने नीना गुप्ता यांना विचारलं,  तुमच्याबद्दल ही अफवा आहे की, तुम्ही हॉलीवूड सीरीज बेवॉच पॉमेला एंडरसनचा रोल करू ईच्छिता. 

यावंर नीना यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तिथे उपस्थित सगळ्या लोकांना हसू फुटलं. नीना म्हणाली की, माझ्याकडे पामेलासारखे मोठं स्तन नाही जे काम करू शकतात. हे उत्तर ऐकून कपिल सुद्धा लाजतो. प्रश्न नॉनवेज होता तर उत्तर तरी व्हेज कसं असेल, असं नीना यांनी सांगितलं.

नीना गुप्ता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. सगळ्यात आधी नीना गुप्ता ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्या प्रेमात पडल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, नीना गुप्ता आणि आलोक नाथ 80 च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. जरी हे नातं फार काळ टिकलं नाही.