'चोली के पिछे' : दिग्दर्शकाच्या अटीमुळे नीना गुप्ता लाजीरवाणी

अट पूर्ण करून दिग्दर्शकाला केलं खूष 

Updated: Jun 17, 2021, 12:54 PM IST
'चोली के पिछे' : दिग्दर्शकाच्या अटीमुळे नीना गुप्ता लाजीरवाणी  title=

मुंबई : बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री नीना गुप्ता सिनेसृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी कायम खूप मेहनत करत असते. नीना गुप्ताने बॉलिवूडमध्ये आपल्या दुसऱ्या इनिंगमधून सिद्ध केलं आहे की, ती कोणत्याही रोलकरता फिट आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या नीना गुप्ता यांच्या 'सच कहूं तो' बायोग्राफीमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

या बायोपिकमुळे नीना गुप्ता यांच्या खासगी आयुष्यावर खूप चर्चा झाली. तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना अतिशय उत्सुकता आहे. ते तिचा मनापासून आदर करत आहेत. असाच एक खुलासा 'चोली के पिछे क्या है' या गाण्याबाबत केला आहे. 'खलनायक' या सिनेमातील गाणं अतिशय लोकप्रिय आहे. 

'खलनायक' सिनेमाचं दिग्दर्शक सुभाष घई यांनी केलं आहे. नीना यांनी आपल्या बायोपिकमध्ये उल्लेख केला आहे की,'या गाण्याबाबत मी खूप उत्सुक होते. जेव्हा मी ते पहिल्यांदा ऐकलंच तेव्हाच मला हे गाणं खूप चांगल होणार असं वाटलं.' मात्र सुभाष घईंनी नीना गुप्ता यांना त्यांची भूमिका सांगितली. त्यानंतर नीना अधिक उत्साही होत्या. तसेच हे गाणं नीना यांची मैत्रिण इला अरूण यांनी गायलं होतं. याअगोदर त्यांनी अनेक सिनेमांत काम केलंय. 

नीना गुप्ता यांना चक्क 'पॅडेड ब्लाऊज' घालण्याचा सल्ला 

नीनाने पुढील सांगितलं की, गाण्याकरता मला गुजराती पोशाख करायचा होता. फायनल लूक पाहण्यासाठी मला सुभाष घईंना दाखवायचं होतं. नीना गुप्ता यांना पाहताच क्षणी 'नाही... नाही.... नाही... काहीतरी भरा.' असं ओरडू लागले. या गोष्टीने नीना गुप्ता यांना खूप लाजीरवाणं वाटलं. नीना यांना माहित होतं की, ही गाण्याची मागणी होती. पण त्यांनी अतिशय लज्जास्पद वाटलं. यामध्ये खासगी काहीच नव्हतं. पण त्या दिवशी त्यांनी शुटिंग केलं नाही. पण नंतर त्यांना ब्लाऊजमध्ये घालण्यासाठी पॅडेड ब्रा दिली होती. त्यानंतर माझा लूक बघून त्यांनी समाधान व्यक्त केलं.