नेहा धुपियाकडून मोठी चूक, चूक सुधारायला धावली पण वेळ निघून गेली

 बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने तिच्या मुलीच्या प्रायव्हसीबद्दल बर्‍याचवेळा चर्चा केली आहे.

Updated: Jul 28, 2021, 10:38 PM IST
नेहा धुपियाकडून मोठी चूक, चूक सुधारायला धावली पण वेळ निघून गेली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने तिच्या मुलीच्या प्रायव्हसीबद्दल बर्‍याच वेळा चर्चा केली आहे. नुकतीच तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला आपल्या मुलीच्या गोपनीयतेचे रक्षण करायचं आहे. म्हणूनच ती आपल्या मुलीचा चेहरा कधीच मीडियासमोर आणत नाही. मात्र, अलीकडेच तिने नकळत एक चूक केली आणि आपल्या मुलीचा चेहरा जनतेसमोर झाकायला विसरली.

नेहा कधीच आपल्या मुलीचा चेहरा दाखवत नाही
सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या नेहा धूपियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगी मेहरचे अनेक फोटो शेअर केले आहेत, मात्र त्यापैकी एकामध्येही तुम्हाला तिच्या मुलीचा चेहरा दिसणार नाही. नेहा प्रत्येक फोटोचा अँगल अशा प्रकारे ठेवते की, तिच्या मुलीचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही. पण अलीकडे जेव्हा ती तिचा नवरा अंगद बेदी आणि मुलगी मेहरसोबत फिरायला गेली होती तेव्हा सगळ्या गोष्टी चुकीच्या ठरल्या.

यावेळी चूकली नेहा धूपिया
नेहा धुपिया आणि अंगद बेदी एकत्र फिरत होते आणि त्यांची मुलगी मेहर तिच्या वडिलांच्या खांद्यावर बसली होती. या दोघांचंही लक्ष मेहरच्या चेहऱ्यावर नव्हतं.  म्हणूनच तिच्या चेहऱ्यावरुन मेहेरचा मास्क काढून टाकल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. छोटी मेहर तिच्या वडिलांच्या खांद्यांवर काळा चष्मा घालून बसली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जनतेसमोर चेहरा प्रकट झाला
यानंतर, नेहा धुपियाने गाडीत बसून बाहेर उभ्या असलेल्या अंगद बेदीकडे पाहिलं तेव्हा तिचं लक्ष तिच्या मुलीच्या पतीच्या खांद्यावर बसलेल्या मेहरकडे गेलं. मेहेरने तिचा मास्क तिच्या चेहऱ्यावरुन काढून घेतल्याचं तिने पाहिलं. यानंतर नेहा घाईघाईने कारमधून खाली आली आणि तिने आपल्या मुलीचा मास्क घातला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला आणि हा संपूर्ण  सीन कॅमेऱ्यात कैद झाला.