नेहा धुपियाने राधिका आपटेला विचारला विचित्र प्रश्न...राधिकाने दिलं हटके उत्तर

पॅडमॅनची अभिनेत्री राधिका आपटे तिचा मित्रा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत नेहा धुपियाचा शो बीएफएफ विद वोग्स या शोमध्ये आली होती. शोची होस्ट नेहा आणि राधिका यांच्योसोबतच राजकुमारने खूप मस्ती केली. नेहाने राधिकाला अनेक इंटरेस्टिंग प्रश्न विचारले. पण नेहाचा एक प्रश्न सगळ्यांच्याच भुवया उंचावणारा होता.

shailesh musale Updated: Mar 27, 2018, 04:17 PM IST
नेहा धुपियाने राधिका आपटेला विचारला विचित्र प्रश्न...राधिकाने दिलं हटके उत्तर title=

मुंबई : पॅडमॅनची अभिनेत्री राधिका आपटे तिचा मित्रा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत नेहा धुपियाचा शो बीएफएफ विद वोग्स या शोमध्ये आली होती. शोची होस्ट नेहा आणि राधिका यांच्योसोबतच राजकुमारने खूप मस्ती केली. नेहाने राधिकाला अनेक इंटरेस्टिंग प्रश्न विचारले. पण नेहाचा एक प्रश्न सगळ्यांच्याच भुवया उंचावणारा होता.

नेहाने राधिकाला विचारलं की, बेडवर तिची फेव्हरेट पोजिशन कोणती आहे. राधिकाने या प्रश्नाचं खूपच मजेदार उत्तर दिलं. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. राधिका आप्टेने म्हटलं की, यात शंका नाही की मी बेडवर एकटीच झोपते. तुम्ही कोणत्या व्यक्तीचा उल्लेख नाही केला.. जेव्हा नेहाने राधिकाला विचारलं की, तुझा फेव्हरेट बॉलिवूड अॅक्टर कोणता तर तिने सुशांत सिंह यांचं नाव घेतलं. 

नेहाने राजकुमार राव याला देखील प्रश्न विचारले. नेहाने विचारलं की तुने कोणत्या सर्वात मोठ्या डिवा सोबत काम केलंय. तर त्याने कंगना रनौतचं नाव घेतलं. राधिकाने रॅपिड फायर राउंडमध्ये देखील अनेक इंटरेस्टिंग उत्तर दिली. ज्यामध्ये तिला विचारलं होतं की, तु पैशासाठी कोणतं विचित्र काम केलं आहे. तेव्हा राधिकाने म्हटलं की, मी साऊथच्या सिनेमांमध्ये काम केलं.

राधिका सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा तिचे फोटो चर्चेचा विषय बनतात.