दुबईमधील शेखबरोबर अफेअर? अभिनेत्री Neha Pendse चा मोठा खुलासा

अभिनेत्री Neha Pendse नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. नेहानं 2020 साली शार्दुलसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. नेहाही छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यापैकी एक म्हणजे 'भाभीजी घर पर है' आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेनं सगळ्यांना वेड लावलं होतं. 

Updated: Mar 18, 2023, 01:19 PM IST
दुबईमधील शेखबरोबर अफेअर? अभिनेत्री Neha Pendse चा मोठा खुलासा title=

Neha Pendse : सेलिब्रिटी हे नेहमीत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामांमुळे तर कधी त्यांच्या खासगी आयुष्यमुळे. सेलिब्रिटींच्या चाहत्यांना तर त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्यात काय होतं हे जाणून घ्यायची इच्छा असते. काही सेलिब्रिटी असतात जे त्यांच्या खासगी आयुष्यावर मोकळेपणानं भाष्य करतात. तर काही सेलिब्रिटी खासगी आयुष्यावर भाष्य करणं टाळतात. जर कोणता सेलिब्रिटी सतत कोणत्या दुसऱ्या कलाकाराला भेटत असेल तर त्यांचे लिंकअप सुरु होतात. यात काही नवीन नाही. मात्र, अभिनेत्री नेहा पेंडसेसोबत (Neha Pendse) असा काही प्रकार घडला की तिलाही आश्चर्य झालं होतं. 

नेहानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. नेहानं प्लॅनेट मराठीच्या ‘पटलं तर घ्या’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळी नेहाला आतापर्यंतची तिने तिच्याबाबत ऐकलेली सर्वात वाईट अफवा याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा नेहा म्हणाली, 'अफवा अशी नाही. पण मी मराठी इंडस्ट्रीमध्ये नवीन होते. तेव्हा अमृता खानविलकरला असं वाटलं होतं की, दुबईमध्ये एका शेखबरोबर माझं अफेअर सुरू आहे.' (Neha Pendse On Dating Dubai's shaikh )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे याविषयी सांगत नेहा म्हणाली, 'मला तिने हे स्वतः सांगितलं होतं. तेव्हा मी तिला म्हटलं होतं की, तुला असं का वाटलं? तेव्हा ती मला म्हणाली, अगं मराठीमध्ये तू अशी एकदम छान दिसते. शरीरयष्टीही अगदी उत्तम आहे. म्हणून मला असं वाटलं की तुझं दुबईमध्ये अफेअर आहे.' यावर मी तिला असं काहीच नाही म्हटलं होतं. माझ्याशी बोलायलाच बहुतेक एखादा शेख घाबरला असावा',  असं नेहा म्हणाली. 

हेही वाचा : घर खर्चासाठी Shashi Kapoor यांना विकावे लागले होते पत्नीचे दागिने!

नेहानं फक्त मराठी नाही तर हिंदी मालिका आणि चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. नेहानं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर हैं मध्ये देखील काम केलं होतं. या मालिकेनं तिला एक आणखी छान ओळख निर्माण करून दिली होती. 2020 साली नेहानं शार्दुलसोबत सप्तपदी घेतल्या होत्या.