close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सेक्रेड गेम्स : राजीव गांधीवरील आक्षेपार्ह शब्द हटवणार नाही - नेटफ्लिक्स

कधी येणार सेक्रेड गेम्सचा पुढील सिझन 

सेक्रेड गेम्स : राजीव गांधीवरील आक्षेपार्ह शब्द हटवणार नाही - नेटफ्लिक्स

मुंबई : सैफ अली खान आणि नवाजुद्दी सिद्दीकी अशी मोठी स्टार कास्ट असलेली सेक्रेड गेम्स ही वेब सिरिज खूप लोकप्रिय झाली. पण या वेब सिरीजसंबंधित वाद काही करून थांबायच नाव घेत नाही. या वेब सिरिजमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरूद्ध वापरलेल्या शब्दांमुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे. आता हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं आहे. आता अशी माहिती मिळाली की, अनेक संकट आली असली तरीही सेक्रेड गेम्समध्ये राजीव गांधी यांच्याविरोधातील डायलॉगला बदलण्यासाठी किंवा ते काढून टाकण्यासाठी नेटफ्लिक्सने मनाई केली आहे. 

नेटफ्लिक्सकडून दिल्ली हायकोर्टने ज्येष्ठ वकिल चंदर लाल यांनी कोर्टात आपली बाजू मांडली. PTI शी बोलताना त्यांनी सांगितले की, मी न्यायालयात सांगितले की, नेटफ्लिक्सचा हे शब्द बदलण्याचा काही विचार नाही. या पुढील सुनावणी ही 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. 

सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत आली. मग त्यामध्ये काँग्रेस, राजीव गांधी यांच्याबद्दल केलेली टिपणी आणि बोल्ड सीन यामुळे ही वेबसिरीज खूप लोकप्रिय ठरली. या वेब सिरीजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि जितेंद्र जोशी या कलाकारांच खूप कौतुक करण्यात आलं.