Aashram 3 : 'फिर खुलेंगे...', ड्रग्ज, बलात्कार आणि राजकाराचे दरवाजे

 'बाबा निराला'च्या आश्रमचे दरवाजे पुन्हा उघडल्यानंतर..  तो व्हिडीओ समोर येताचं...   

Updated: May 26, 2022, 05:29 PM IST
Aashram 3 : 'फिर खुलेंगे...', ड्रग्ज, बलात्कार आणि राजकाराचे दरवाजे title=

मुंबई :  सध्या सर्वत्र 'आश्रम 3' सीरिजची चर्चा रंगत आहे. 'आश्रम 3' ही वेबसिरीज रिलीज होण्याआधीच बाबा निरालाने सर्वांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. बाबाच्या भीतीच्या प्रत्येकजण मार्गाने आपले जीवन वेगळ्या पद्धतीने व्यतीत करत आहे. याचा खुलासा एका प्रोमो व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे. जिथे प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत असतो आणि तो प्रश्न 'कब खुलेंगे दरवाजे.' 

बॉबी देओलशिवाय हा व्हिडीओ अभिनेत्री त्रिधा चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत बॉबी देओलने कॅप्शनमध्ये 'आता प्रतीक्षा संपेल कारण 3 जूनला एका बदनाम आश्रमाचे दरवाजे उघडतील...फक्त एमएक्स प्लेयरवर.' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आश्रम वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची अशी भूमिका साकारली, की तो लोकांच्या मनात घर करून गेली. या वेब सिरीजची कथा काशीपूर या काल्पनिक शहरावर आधारित आहे. 

बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सिरीजची कथा ड्रग्ज, बलात्कार आणि राजकारणाभोवती फिरते. प्रकाश झा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.