महिला खासदाराच्या ''बायसेक्युअल'' आरोपांवर निखिल जैनने मौन सोडलं..

महिला खासदाराच्या ''बायसेक्युअल''च्या आरोपांवर निखिल जैनचं अखेर उत्तर, म्हणाला...

Updated: Nov 25, 2021, 01:02 PM IST
महिला खासदाराच्या ''बायसेक्युअल'' आरोपांवर निखिल जैनने मौन सोडलं..

मुंबई : पश्चिम बंगालच्या टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचं नातं आता संपलं आहे. दोघांनी त्यांचे मार्ग निवडले आणि वेगळे झाले आहेत. 2019 साली मोठ्या थाटात त्यांनी लग्न केलं. पण लग्न झाल्यानंतर एक वर्षात ते वेगळे झाले. दोघांच्या नात्याने सर्वत्र खळबळ माजली. नुकतेच कोलकाता न्यायालयाने दोघांचे लग्न अवैध ठरवले. काही महिन्यांनंतर निखिल जैन यांनी स्वतःवर लावण्यात आलेल्या आरोपांवर मौन सोडले आहे.

नुसरत यांनी निखिल यांच्यासोबत झालेल्या लग्नाला नकार दिला. विशेष विवाह कायद्यांतर्गत भारतात लग्नाची कोणतीही नोंदणी नव्हती, त्यामुळे विवाह भारतात कायदेशीररित्या वैध नाही. एवढंच नाही तर न्यायालयानेही नुसरत जहाँ यांचा मुद्दा मान्य केला. महत्त्वाचं म्हणजे वेगळं झाल्यानंतर नुसरत यांनी निखिल बायसेक्युअल असल्याचा अरोप केला. 

नुसरत यांनी केलेल्या सर्व आरोपांवर निखिल जैन यांनी पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, 'मी बायसेक्युअल नाही... मी आजही नुसरतवर प्रेम करतो..' नुसरत जहाँ अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. निखिल जैनपासून विभक्त झाल्यानंतर नुसरत यांनी मुलाला जन्म दिला. सोबतचं अभिनेता यश दासगुप्तासोबत त्यांच्या अफेअर चर्चे देखील वाऱ्यालारखी पसरत आहे.