Bigg Boss Marathi Season 5 : सध्या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. सिनेकलाकारांसह सोशल मीडिया स्टार्सला संधी दिल्याने सध्याचा सिझन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, सध्या या शोमध्ये वारंवार मराठी कलाकारांचा होत असलेल्या अपमानामुळे वादाला तोंड फुटलं आहे. जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीने आता पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडीचा त्याच्या अभिनयावरून अपमान केला आहे. त्यामुळे आता मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून यावर संताप व्यक्त केलाय.
निक्की बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना 'जोकर' म्हणालात.. ! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुमच्याकडे नाही. गेली अनेक वर्ष हे काम तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप, अशी टीका विशाखा सुभेदारने केली आहे.
होय आमचा पॅडी 'जोकर'च आहे. ठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा असा आमचा पॅडी... पाय घट्ट रोवून उभा असलेला मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि ह्या सगळया सगळ्याचा वागण्या बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला उत्तम आणि संयमी माणूस, असा उल्लेख करत मराठी अभिनेता आणि बिग बॉस फेम अभिजीत केळकरने जान्हवी आणि निक्कीवर टीका केली आहे.
जोकर... बरं मग... ओव्हर अॅक्टिंग... बरं मग... पण या ओव्हर अॅक्टिंग करणाऱ्या जोकरचा संयम दिसत नाही का तुला? एकदा का तो सुटला की तुझी बिग बॉस मराठी मधली ओव्हर अॅक्टिंग वाली जोकरगिरी पण दिसणार नाही. याला म्हणतात "अनुभव" तुझ्यासारखी कितीही (जा)नवी लोकं आली ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जुनं तेच सोनं आणि माझा भाऊ प्रेमाने जग जिंकणार आहे, असं सिद्धार्थ जाधवने म्हटलं आहे.
पॅडी, तुझा प्रवास आणि तुझा संधर्ष आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलाय. नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना…आताही बिग बॉस मध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोयस ती आम्ही मस्त एंजॉय करतोय. जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरजच नाही. तू बिनधास्त लढ, आम्ही आहोत तुला फायनलपर्यंत घेऊन जायला, असं मनेसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
पॅडी, तुझा प्रवास आणि तुझा संधर्ष आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलाय. नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना… आताही बिग बॉस मध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोयस ती आम्ही मस्त एंजॉय करतोय. जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरजच नाही. तू बिनधास्त लढ, आम्ही… pic.twitter.com/n8246obfgJ
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 21, 2024