'स्त्री 2' मधील 7 फूट 6 इंचांचा 'सरकटा' व्हिलन कोणी साकारलाय माहितीये का? कोण आहे हा सुनील कुमार?

'स्त्री 2' चित्रपटातील व्हिलनचीही सध्या चांगली चर्चा रंगली आहे. दरम्यान अनेकांना हा सरकटा साकारणारा अभिनेता कोण आहे याची उत्सुकता आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 21, 2024, 06:10 PM IST
'स्त्री 2' मधील 7 फूट 6 इंचांचा 'सरकटा' व्हिलन कोणी साकारलाय माहितीये का? कोण आहे हा सुनील कुमार? title=

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. स्त्री 2 ने 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करत नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. चित्रपटात पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर 'स्त्री 2' मध्ये वरुण धवन आणि अक्षय कुमार यांचाही कॅमिओ आहे. या सर्वांचं कौतुक होत असताना व्हिलन सरकटानेही लक्ष वेधून घेतलं आहे. हा अतिशय योग्य व्हिलन असल्याची पोचपावती प्रेक्षकांनी दिली आहे. पण हा सरकटा कोणी साकारला आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

स्त्री 2 चित्रपटाच्या दिग्दर्शकाने स्त्री 2 चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची झोप उडवणारा हा व्हिलन कोणी साकारला आहे याचा अखेल उलगडा केला आहे. हा व्हिलन साकारणारा अभिनेता सुनील कुमार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Jatt (@sunnyjatt_019)

कोण आहे सुनील कुमार?

सुनील कुमार जम्मूचा राहणारा आहे. त्याला जम्मूचा 'ग्रेट खली' म्हणूनही ओळखलं जातं.  त्यांने स्त्री 2 मध्ये मुख्य व्हिलनची भूमिका साकारली आहे. त्याला ‘द ग्रेट खली ऑफ जम्मू’ म्हणून ओळखलं जाते, विशेष म्हणजे तो खलीपेक्षा उंच आहे. द ग्रेट खलीची उंची 7 फूट 3 इंच आहे, तर सुनील कुमारची उंची 7 फूट 6 इंच आहे. तो एक व्यावसायिक कुस्तीपटू आहे आणि 2019 मध्ये WWE ट्रायआऊटचा एक भाग होता. त्याचे रिंग नाव 'द ग्रेट अंगार' आहे आणि त्याची WWE मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे.

बॉलीवूड हंगामानुसार, तो जम्मू आणि काश्मीर पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. हँडबॉल आणि व्हॉलीबॉल खेळत त्याने क्रीडा कोट्यातू नोकरी मिळवली. त्याला जिमची प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे एक जीप आहे. 

'स्त्री 2' चे निर्माते अमर कौशिक यांनी सरकटाच्या भूमिकेसाठी सुनील कुमारची निवड करण्याबद्दल खुलासा करताना बॉलिवूड हंगामाला सांगितलं की, "कास्टिंग टीमने त्याला शोधून काढले. आम्हाला खूप उंच असणारा माणूस हवा होता, आणि तो त्यात चपखल बसला. आम्ही त्याच्या शरीराचे शॉट्स वापरले. चेहरा दाखवताना CGI चा वापर केला."

हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' मध्ये स्त्रीच्या मुलीच्या भूमिकेत श्रद्धा कपूर, 'चंदेरी का रक्षक' म्हणून राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चंदेरीला एका नवीन खलनायकाने कसे पछाडले आहे, जो शहरातील महिलांचे अपहरण करतो आणि कशाप्रकारे स्त्री त्याला पराभूत करण्यासाठी परत येते याभोवती चित्रपट फिरतो. चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असून फायटरच्या देशांतर्गत कमाईला केवळ 5 दिवसांत मागे टाकले आहे आणि आता कल्की 2898 AD च्या देशांतर्गत कमाईला मागे टाकण्याकडे वाटचाल करत आहे.