नातूच्या शाळेत पोहोचल्या नीता अंबानी मात्र, चर्चा करीनाचा मुलगा जेहची

Nita Ambani and Jeh : नीता अंबानी पोहोचल्या नातवाला भेटायला मात्र, सगळ्यांचं लक्ष वेधलं ते करीनाच्या लेकानं...

दिक्षा पाटील | Updated: Oct 7, 2024, 07:03 PM IST
नातूच्या शाळेत पोहोचल्या नीता अंबानी मात्र, चर्चा करीनाचा मुलगा जेहची
(Photo Credit : Social Media)

Nita Ambani and Jeh : लोकप्रिय बिझनेसमॅन मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या नेहमीच त्यांची सुंदरता आणि साधेपणाला घेऊन चर्चा करतात. नीता अंबानी यांनी नुकताच त्यांचा नातू पृथ्वी अंबानीच्या शाळेत पोहोचल्या. तिथले त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या नातवांसोबत त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या मुलांसोबत देखील वेळ व्यथित केला. त्यावेळी त्या मुलांसोबत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह देखील दिसला. त्या जेहला गोष्ट सांगताना दिसल्या. 

Add Zee News as a Preferred Source

नीता अंबानी यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यात छोटी-छोटी मुलं ही त्यांच्या वर्गात बसल्याचे दिसून येत आहे. एका फोटोत नीता अंबानी या शाळेत खुर्चीवर बसल्याचे दिसून येत आहे. तर वर्गातील इतर मुलं हे त्यांच्या समोर खाली बसले आहेत. फोटोत दिसून येत आहे की नीता अंबानी या पेप्पा पिगच गोष्ट वाचून दाखवत आहेत. समोर आलेल्या या फोटोंमध्ये पृथ्वी व्यतिरिक्त करीना कपूरचा छोटा मुलगा जेह अली खान देखील दिसला. नीता अंबानी जे सांगत आहेत ते तो शांतपणे ऐकत असल्याचे दिसत आहे. पृथ्वीप्रमाणेच तोपण गोष्ट ऐकतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

याशिवाय व्हायरल होत असलेल्या फोटोंमधील एका फोटोत नीता अंबानी या शाळेतल्या मुलांसोबत लंच टेबलवर बसल्याअसून त्यांच्याशी जेवताना दिसत आहे. त्याशिवाय एका फोटोत नीता अंबानी त्यांच्या मुलांसोबत टेबलवर क्राफ्ट करत आहेत. या फोटोंना सोशल मीडियावर शेअर करत DAIS NMAJS Mumbai नं शेअर करत कॅप्शन दिलं की गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी NMAJS अर्ली इयर्स कॅंपसचा एक खास दिवस ठरला कारण आमचे चेअरपर्सन श्रीमती नीता अंबानी यांनी अचानक आमच्या शाळेत आल्या.

हेही वाचा : गायक अदनान सामीला मातृशोक, फोटो शेअर करत चाहत्यांना केली प्रार्थना करण्याची विनंती

दरम्यान, पृथ्वी अंबानी हा मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता यांचा मुलगा आहे. पृथ्वी हा मुंबईच्या वांद्रे येथे असलेल्या मुकेश अंबानी ज्युनियर स्कूल (एनएमएजेएस) मध्ये शिकतात. इथेच जेह अली खान त्याच्या क्लासमेट आहे. 

About the Author