गूगल गर्ल देतेय उर्फी जावेदला टक्कर; फोटो पाहून म्हणाल, 'आता ही पण'...

 नितिभा कौलने अलीकडेच तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसह शेअर केले आहेत. 

Updated: May 11, 2022, 08:22 PM IST
गूगल गर्ल देतेय उर्फी जावेदला  टक्कर; फोटो पाहून म्हणाल, 'आता ही पण'... title=

मुंबई :  'बिग बॉस' ची एक्स स्पर्धक, गुगल गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या नितिभा कौलने अलीकडेच तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसह शेअर केले आहेत. नितीभाचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहते तिची उर्फी जावेदशी तुलना करताना दिसत आहेत.

नितीभा कौल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांसोबत आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते. या एपिसोडमध्ये तिने पुन्हा तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर  शेअर केले आहेत.

या ताज्या फोटोंमध्ये, नितीभा कौल अतिशय सिझलिंग स्टाईलमध्ये मोनोकिनी परिधान करताना दिसत आहेत. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी अभिनेत्री तिचे टोन्ड लेग्स फ्लॉंट करताना दिसतेय.

नितिभा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नितिभाची इन्स्टा टूर पाहिली तर, तिला खाण्याची आणि वेकेशन एन्जॉय करण्याची खूप आवड आहे.

प्रत्येक फोटोत नितिभा एका नवीन अद्भुत गंतव्यस्थानावर दिसते. बिग बॉसनंतर नितिभाने अभिनयात हात आजमावला नसेल पण फॅशनच्या बाबतीत ती खूपच प्रयोगशील आहे.

नितिभाने बिग बॉसमध्ये विशेष कामगिरी केली नाही पण ती गुगल गर्ल या नावाने देशभरात लोकप्रिय झाली. वास्तविक नितिभाने गुगलमध्ये नोकरी केली आहे.