Nora Fatehi Troll : कट अशा ठिकाणी असल्यामुळे नोरा फतेही ट्रोल, VIDEO पाहा

बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर नोरा सोशल मीडियावर ट्रोल 

Updated: Nov 29, 2021, 07:09 AM IST
Nora Fatehi Troll : कट अशा ठिकाणी असल्यामुळे नोरा फतेही ट्रोल, VIDEO पाहा

मुंबई : नोरा फतेही ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती नेहमीच सुंदर फोटो आणि व्हिडिओतून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. ती तिच्या आकर्षक फोटोसोबतच आधुनिक प्रो-मॉडर्न ड्रेसिंग सेन्समुळे जास्त ओळखली जाते. त्याचबरोबर नोरा फतेही तिच्या बोल्ड टॉपमुळे ट्रोलच्या निशाण्यावर असते. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॉपचा विचित्र कट ठरला ट्रोलच कारण 

नोरा अलीकडेच एका व्हिडिओमध्ये विमानतळाबाहेर पडताना दिसली होती. या लूकमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. नोराने बोल्ड टॉप आणि ग्रे स्वेटपँट घातली होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती सनग्लासेस घातलेली दिसत आहे. 

पण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तिने स्वेटशर्ट काढला आणि हातात घेतला आणि वेगाने चालायला लागली. अशा स्थितीत तिच्या टॉपचा विचित्र कट लोकांच्या डोळ्यासमोर आला. हा व्हिडिओ पहा...

व्हिडिओमध्ये या विचित्र कटमुळे नोरा खूप ट्रोल झाली आहे. हा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये शेअर करण्यात आला आहे. आता त्याच्या कमेंट बॉक्समध्ये काही लोक नोरा आणि काही व्हिडिओ बनवणाऱ्या फोटोग्राफरला ट्रोल करत आहेत. कुणी म्हणतंय की स्लो मोशनमुळे तिचा ड्रेस जास्त विचित्र दिसतोय, तर कुणी लिहिलंय की कॅमेरा पाहून स्वेटशर्ट काढलंय का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे. 

नोरा फतेहीच्या करिअरची सुरुवात 'बिग बॉस'पासून झाली आणि तेव्हापासून तिने अनेक गाण्यांमध्ये काम केले आहे. तिच्या 'दिलबर' आणि 'गर्मी' या गाण्यांनी बरीच चर्चा सुरू केली आहेत. नोराने नुकतेच 'छोड देंगे' या गाण्यात काम केले आहे. यापूर्वी ही अभिनेत्री 'नच मेरी रानी' गाण्यात दिसली होती. अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटातही नोरा दिसली होती.