हॉट नोराचा ब्लू लेदर ड्रेसमधील स्टनिंग लूक; या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क

नोरा फतेही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. 

Updated: Jul 18, 2021, 04:44 PM IST
हॉट नोराचा ब्लू लेदर ड्रेसमधील स्टनिंग लूक; या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क title=

मुंबई : डान्स आणि सौंदर्य तसंच तिच्या स्टाईलमुळे अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. जशी नोरा तयारी करुन घराच्या बाहेर पडते तशी नोरा सोशल मीडियावर चर्चेत येते. नोरा फतेही पुन्हा एकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. तिने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

ब्लू लेदर आउटफिटमध्ये दिसली नोरा फतेही
ब्लू लेदर आउटफिट, मोकळे केस, वाइड राउंड ईयरिंग, रेड डार्क लिप शेड....नोराची ही स्टाईल पाहून तिचे चाहते हैराण झाले असतील हे नक्कीच. नोराने या फोटोशूटसाठी बऱ्याच स्टाईलीश पोज दिल्या आहेत. नोराचा हा स्टनिंग लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या ड्रेसमधील नोराचे फोटो समोर येताच त्याचा बाजारभाव देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा ड्रेस 24 हजारांपर्यंत मिळू शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. म्हणजेच नोराचा हा स्टाईलिश ड्रेस फार कमी किंमतीत आपला होवू शकतो.

ब्लॅक अँण्ड व्हाइट शेडमध्ये आली समोर
तसं, या दिवसांत नोरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. दोन दिवसांपूर्वी नोराच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्याचबरोबर नोराने एक व्हिडिओ देखील शेअर केला होता या व्हिडिओत ती ब्लॅक अँण्ड व्हाइट शेड असलेल्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तिची ही स्टाईलदेखील चाहत्यांना खूप आवडली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच आपल्याला ती डान्सिंग व्यतिरिक्त एक्टिंग करताना पहायला मिळणार आहे.. नोरा अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्त यांच्यासोबत 'भूज' या चित्रपटात दिसणार आहेत. ज्यामध्ये ती सिक्रेट एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील नोराचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.