नोरा फतेही वाढवणार 'डांस दीवाने'च्या स्टेजवर गर्मी, मेकर्स खेळतायेत TRP गेम?

नोरा गेल्या वर्षी भारताच्या बेस्ट डान्सर शोमध्ये जज म्हणून आल्यामुळे शोचा टीआरपी बराच वाढला होता

Updated: Apr 14, 2021, 09:18 PM IST
नोरा फतेही वाढवणार 'डांस दीवाने'च्या स्टेजवर गर्मी, मेकर्स खेळतायेत TRP गेम? title=

मुंबई: डान्स दिवाने 3 मध्ये एका पेक्षा एक डान्सर सहभागी झाले आहेत. माधुरी दीक्षित, तुषार आणि पुनीत पाठक या शोचं जज म्हणून काम पहातात. धर्मेशला कोविड पॉझिटिव्ह आल्यांने, या शोमध्ये त्याच्या जागेवर पुनीत या शोमध्ये जजचं काम पाहणार आहे. आता या शोमध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे- नोरा फतेही. नोरा फतेही लवकरच 'डान्स दिवाना' सीझन 3 च्या सेटवर दिसणार आहे.

या वाहिनीच्या तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नोराचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये ती माधुरीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की नोरा फतेही माधुरीला तिच्या 'दिलबर दिलबर' या लोकप्रिय गाण्याचे सिग्नेचर स्टेप शिकवत आहे. त्याच वेळी नोराने स्टेप्स शिकवल्यानंतर माधुरीने लगेच तिच्या स्टेप कॉपी करुन डान्स सादर केला

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

याशिवाय या चॅनलने नोराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नोरा म्हणते आहे की, - मला डान्सचं किती वेड आहे हे सगळ्यांनाच चागलंच माहिती आहे. जिथे डान्स नाही, तिथे मी शक्य नाही. म्हणूनच मी या सीझन 3मध्ये डान्स सादर करायला येत आहे. या शोमध्ये येण्याचे माझे दोन हेतू आहेत. एक स्पर्धकांना भेटायला. आणि दुसरा म्हणजे, माधुरी मॅमला भेटण्यासाठी, त्यांचे चाहते त्यांना भेटायला वेड असतात. मी आणि राघव शोमध्ये एकत्र आलो तर खूप मजा करु.

नोरा गेल्या वर्षी भारताच्या बेस्ट डान्सर शोमध्ये जज म्हणून आल्यामुळे शोचा टीआरपी बराच वाढला होता. जेव्हा छय्या छाय्या गर्ल मलायका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले तेव्हा नोराने मलायका अरोराच्या जागी जज म्हणून काम पाहिलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

आता नोरा डान्स दिवाना सीझन 3चा भाग बनल्यानंतर हा शो मेकर्सची टीआरपी मिळवण्याचा विचार करीत आहे की काय असा अंदाज बांधू लागला आहे. नोराचे जगभरात लाखो चाहते आहेत. तिची खूप चांगली फॅन फॉलोइंग आहे. नोराची हिंदी बोलण्याचा अंदाज आणि तिचा डान्सचा प्रत्येकजण वेडं आहे. अशा परिस्थितीत नोराला शोमध्ये आणणे निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.