यंदाच्या नवरात्रोत्सवात खेळा सायलेंट गरबा

जिकडे-तिकडे फक्त गरब्याची चर्चा रंगताना दिसत आहे.

Updated: Sep 26, 2019, 07:40 PM IST
यंदाच्या नवरात्रोत्सवात खेळा सायलेंट गरबा title=

मुंबई : आता सर्वत्र गरब्याची लगबग पाहायला मिळत. जिकडे-तिकडे फक्त गरब्याची चर्चा रंगताना दिसत आहे. पण प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे ध्वनिप्रदूषणाचा. ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबईत कडक नियम आहेत, या नियमांना पाठिंबा देण्यासाठी राजमहाल बँक्वेट्ने  काही वर्षांपूर्वी "सायलेंट गरबा" सुरु केला होता. यंदाच्या वर्षी देखील हा गरबा रंगणार आहे.   

'राजमहाल बँक्वेट्ने आणि थिंकींगमंत्रा' यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या "लाईव्ह सायलेंट गरबा २.०"ची घोषणा केली आहे. अश्या अनोख्या प्रकारच्या गरब्याचे आयोजन दिनांक ४ ते ६ ऑक्टोबर  रोजी मालाड(प) येथील 'राजमहाल बँक्वेट' येथे करण्यात आले आहे. www.bookmyshow.com या संकेतस्थळावर पास उपलब्ध आहेत.

'लाइव्ह सायलेंट गरबा २.०' हे लाईव्ह गाणे सादर करण्याची एक वेगळा  आनंद  आहे.मध्यरात्री २ वाजेपर्यंत कोणतेही नियम न मोडता जेव्हा हेडफोन्स लाऊन गरबा खेळण्याचा आनंद घेता येईल.