मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगणचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. त्याचबरोबर, तिच्याबद्दल एक बातमी समोर येत आहे ज्यामध्ये ती लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्याची चर्चा चित्रपटसृष्टीत जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर काजोलने मुलीच्या पदार्पणावर एक प्रतिक्रिया दिली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
न्यासा देवगणने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसेल, मात्र या आधीच तिचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. त्याचबरोबर, आता न्यासा देवगन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. ज्यावर काजोल म्हणाली, 'माझ्या मुलांचा प्रश्न आहे, मला वाटतं की, त्यांना जे काही करायचं आहे, मी त्यांना सपोर्ट करेन.
'मला वाटतं की, आई म्हणून माझे सर्वात मोठं काम तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मार्गदर्शन करण नाही तर त्यांना ज्यामध्ये आनंद मिळतो त्यासाठी प्रोडक्टिव करणं आहे. ' ती असंही म्हणाली की, 'मला वाटतं की न्यासा ही अशी मुलगी आहे. जी स्वत:चे निर्णय स्वत: घेईल, मी म्हटल्याप्रमाणे, मी तिला इंडस्ट्रीपासून दूर नेत नाही. मी तिला अभिनेत्री होण्यासाठी जबरदस्ती करत नाही. ती स्वतःसाठी काहीतरी करेल. ती 18 वर्षांची आहे, एक एडल्ट मुलगी आहे. ती एक यंग स्त्री आहे.
त्याचवेळी अजयला मुलाखतीत विचारण्यात आलं की, न्यासाची बॉलिवूडमध्ये काम करण्याची काही योजना आहे का? यावर त्याने उत्तर दिलं की, 'मला माहित नाही की, तिला या लाईनमध्ये यायचं आहे की नाही, आजपर्यंत तिने यात रस दाखवला नाही. मुलांसह, कधीही काहीही बदलू शकतं.' त्याच वेळी, चाहते न्यासाला पडद्यावर पाहण्याची वाट पाहत आहेत.