सुष्मिताविषयी प्रियकराने लिहिली भावनिक पोस्ट

त्याने पहिल्यांदाच तिच्यासोबतचा फोटो पोस्ट केला 

Updated: Nov 19, 2018, 04:12 PM IST
सुष्मिताविषयी प्रियकराने लिहिली भावनिक पोस्ट title=

मुंबई : 'प्यार छुपायें नही छुपता', असं म्हणतात ते खरंच आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनच्या आयुष्यात सध्या ती याचाच प्रत्यय घेत असावी असं म्हणायला हरकत नाही. आपल्या सौंदर्याच्या आणि प्रभावी व्यक्तीमत्वाच्या बळावर आंतराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्वं करणाऱ्या या अभिनेत्रीला अनेकांचीच पसंती मिळालेली. 

रुपेरी पदड्यावर आणि त्यापलीकडे आपल्या कक्षा रुंदावत अनेका आव्हानांना तोंड देणाऱ्या सुष्मिताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्यावर अनेकांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला. 

सुष्मिताला देण्यात आलेल्या या शुभेच्छांमध्ये सर्वाधिक खास ठरल्या त्या म्हणजे तथाकथित प्रियकर रॉमन शॉल याने दिलेल्या शुभेच्छा. 

एकिकडे सोशल मीडियापासून कलावर्तुळापर्यंत सर्वत्रच सुष्मितावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना रॉमनने अखेर त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

इन्स्टाग्रामवर त्याने पहिल्यांदाच तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्या पोस्टमध्ये नाव न घेता तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

'आज कोणाचा वाढदिवस आहे पाहा..... वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा जान', असं लिहित त्याने आपल्या आयुष्यातील अत्यंत खास व्यक्तीला म्हणजेच सुष्मिताला शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात तिच्यावर आनंदाचा वर्षाव होवो, अशी कामनाही त्याने केली आहे. 

मुख्य म्हणजे रॉमनने पोस्ट केलेल्या फोटोमध्येही सुष्मिताचा फोटो स्पष्ट दिसत नाही आहे. पण, कमेंटमध्ये मात्र या दोघांच्या प्रेमाची ग्वाही देणाऱ्याच अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्याचा हा अंदाज अनेकांचीच मनं जिंकत असून, सुष्मिताच्या आयुष्यात आलेल्या सुरेख वळणाविषयीसुद्धा खूप काही सांगून जात आहे.