सोनू सुदचा जबरा फॅन, जीभेने रेखाटलं जबरदस्त पेटींग

हा सर्व प्रकार पाहून सोनू सुद देखील थक्क झाला. यावेळी उपस्थित असलेल्या कॅमेऱ्यात सर्व काही कैद झालं.

Updated: Jul 31, 2021, 08:49 PM IST
सोनू सुदचा जबरा फॅन, जीभेने रेखाटलं जबरदस्त पेटींग

मुंबई: सोनू सूदचा यंदाचा वाढदिवस मुंबईत अगदी जल्लोषात साजरा करण्यात आला. सोनूने कोरोना काळात गरजूंना केलेल्या मदतीसाठी वेळोवेळी त्याचं कौतुक करण्यात आलं. त्यानंतर त्याचा 48 वा वाढदिवस आणखीनंच स्पेशल करण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सोनूच्या घराखाली चाहते मोठ्या प्रमाणात दिसून आले. 

त्यात आता सोनू सूदचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्यांपैकी एका फॅनचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. या चाहत्याने सोनूला खास आपल्या शैलीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

हा सर्व प्रकार पाहून सोनू सुद देखील थक्क झाला. यावेळी उपस्थित असलेल्या कॅमेऱ्यात सर्व काही कैद झालं.

 सोनूला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेल्या एका चाहत्याने चक्क आपल्या जिभेच्या सहाय्याने अभिनेत्याचं चित्र कागदावर काढलं. अवघ्या काही मिनिटात त्याने उभ्या उभ्या सोनूचं पेटींग रेखाटलं.