रणवीर आणि दीपिका हिंदुजा रुग्णालयात स्पॉट, युजर्स म्हणाले गुडन्यूज आहे का?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. 

Updated: Jul 31, 2021, 08:05 PM IST
रणवीर आणि दीपिका हिंदुजा रुग्णालयात स्पॉट, युजर्स म्हणाले गुडन्यूज आहे का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशा परिस्थितीत दीपिकाशी संबंधित प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नकताच दिपवीरचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, दीपिका रणवीर सिंगसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे.

दीपिकाने नोव्हेंबर 2018 मध्ये अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केलं. दोघांनी इटलीमध्ये लग्नाच्या सात फेऱ्या घेतल्या. लग्नानंतर हे जोडपं अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. अशा परिस्थितीत आता दीपिका हॉस्पिटलमध्ये पोहचल्याने चाहत्यांना तिची चिंता वाटत आहे.

दीपिका-रणवीर हॉस्पिटलमध्ये गेले
व्हायरल भयानीने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात दीपिका आणि रणवीर एका कारमध्ये बसलेले दिसत आहेत. या पोस्टसह कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे की, हे जोडपं खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोहोचलं आहे. अशा परिस्थितीत, आता ही पोस्ट पाहून चाहते अस्वस्थ झाले आहेत की, दोन्ही स्टार्स हॉस्पिटलमध्ये का गेले.

दोघांनाही रुग्णालयात जाण्याचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते हतबल झाले आहेत आणि सर्वकाही ठीक आहे का हे सतत विचारत आहेत. त्याचवेळी, काही युजर्स आहेत जे असे म्हणत आहेत की, दिपीका प्रेग्नंट आहे. मात्र, दिपीका रणवीरसोबत रुग्णालयात का पोहोचली हे स्पष्ट झालेलं नाही. त्याचवेळी, असंही म्हटलं जात आहे की, हे दोघेही लसीकरणाचा पहिला डोस घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दीपिका आणि रणवीरचे नातं
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचं अफेअर संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला चित्रपटापासून सुरू झालं. या चित्रपटात दोन्ही स्टार्स मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानंतर या दोघांच्या अफेअरच्या बऱ्याच बातम्या आल्या होत्या. दीपिकाने नेहमीच रणवीरसोबतचे संबंध नाकारले होतं मात्र तरीही एक रणवीर होता ज्याच्या डोळ्यात दीपिकावरचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. जेव्हा दोघांनी अधिकृतपणे लग्नाची घोषणा केली तेव्हा सगळ्यांनाच आनंद झाला होता. आता दोघंही त्यांचं वैवाहिक जीवन सुखात जगत आहेत.