'एका सच्च्या माणसाची...', 'धर्मवीर' सिनेमानंतर प्रसाद ओकची 'ती' पोस्ट व्हायरल

'धर्मवीर'  सिनेमाचा आणखी एक विक्रम... प्रसाद ओक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाला, 'एका सच्च्या माणसाची...'  

Updated: Aug 10, 2022, 03:10 PM IST
'एका सच्च्या माणसाची...', 'धर्मवीर' सिनेमानंतर प्रसाद ओकची 'ती' पोस्ट व्हायरल title=

मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे कळाले.  कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं.  

13 मे रोजी दिघे साहेबांचा जीवनपट पडद्यावर आला आणि पहिल्याचं दिवशी सिनेमाने दणदणीत विक्रम रचला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तुफान मजल मारली. आता पुन्हा 'धर्मवीर' सिनेमाच्या नावावर यंदाच्या वर्षातील मोठा विक्रम रचला आहे. 'धर्मवीर' सिनेमाला आता तिसरा पुरस्कार मिळाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिनेमााला एका मागोमाग एक पुरस्कार मिळताना दिसत आहे. असं असताना प्रसाद ओकची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 
 
प्रसाद ओकने पोस्ट शेअर करत सिनेमाला आणखी एक पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली आहे. 'धर्मवीर'चा तिसरा पुरस्कार… 'माझा पुरस्कार'… एका सच्च्या माणसाची भूमिका केल्याचं कौतुक एका सच्च्या माणसाकडून…!!! धन्यवाद मुळये काका… धन्यवाद टीम धर्मवीर…” असं कॅप्शन मध्ये लिहीलं आहे. 

'धर्मवीर' सिनेमात आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि त्या प्रत्येक प्रसंगाला ते कसे सामोरे गेले हे सर्वच या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक यानं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.

प्रसादने साकारलेले आनंद दिघे पाहताना त्यानं या व्यक्तीरेखेसाठी घेतलेली मेहनत लगेचच लक्षात येत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं, हिंदूच्या पाठी ठाम उभं राहाणं, महिलांना सुरक्षितता देणं, सामाजिक तंटे सोडवणं, ठाण्याचा विकास करणं अशी अनेक काम दिघेसाहेबांनी केली आहेत.