Oscars 2023: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरने 'नाटू नाटू' गाण्यावर परफॉर्म का केलं नाही? समोर आलं खरं कारण

राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) ऑस्कर 2023 (Oscars 2023)  मध्ये 'नाटू नाटू' (Naatu Naatu) गाण्यावर सादरीकरण करणार होते. पण नंतर दोघांनी अनेक कारणांनी माघार घेतली. निर्माता राज कपूर (Raj Kapoor) यांनी यामागील कारणांचा खुलासा केला आहे. अकॅडमीने (The Academy) या गाण्याच्या सादरीकरणासाठी अखेर इतर कलाकारांना आमंत्रित केलं. 

Updated: Mar 15, 2023, 01:44 PM IST
Oscars 2023: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरने 'नाटू नाटू' गाण्यावर परफॉर्म का केलं नाही? समोर आलं खरं कारण title=

Oscars 2023 Naatu Naatu Song: ऑस्कर 2023 मध्ये राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाने इतिहास रचला आहे. 'नाटू नाटू' (Naatu Naatu) गाण्याला ऑस्कर (Oscars 2023) पुरस्कार मिळाला असून भारतीय चित्रपटसृष्टीने (Indian Film Industry) अखेर आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यातही 'नाटू नाटू' गाण्याची क्रेझ दिसून आली. गायक काल भैरव आणि राहुल (Kaala Bhairava and Rahul Sipligunj) यांनी मंचावर हे गाणं सादर करणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणी होती. दरम्यान, तुम्हाला माहिती आहे का राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) या गाण्यावर डान्स करणार होते. पण अनेक कारणांमुळे त्यांनी माघार घेतली. 

राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरने माघार का घेतली?

RRR ला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत (Best Original Song category) 'नाटू नाटू' गाण्यासाठी ऑस्कर मिळाला आहे. या श्रेणीत हा पुरस्कार मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे. ऑस्करमध्ये या गाण्यावर लाईव्ह परफॉर्मन्सही करण्यात आला. पण यावेळी चाहत्यांनी राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरने हा डान्स का केला नाही असा प्रश्न पडला. दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार, दोघेही अभिनेते या गाण्यावर डान्स करणं अपेक्षित होतं. पण नंतर त्यांनी माघार घेतली. 

र्माते राज कपूर यांनी द अकॅडमीला सांगितलं की, "दोन्ही अभिनेत्यांची या गाण्यावर मंचावर डान्स करण्याची इच्छा नव्हती. त्यांना थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. आधी दोन्ही अभिनेते गायक राहुल आणि काल भैरव यांच्यासह मंचावर परफॉर्म करणार होते. फेब्रुवारी महिन्यात आम्हाला राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर ऑस्करला हजेरी लावणार असल्याची माहिती देण्यात आली. पण ते मंचावर परफॉर्म करण्यात फार इच्छुक नसल्याचंही सांगण्यात आलं. त्यांना सराव करण्यासाठी जास्त वेळ नसल्याने तसंच इतर व्यावसायिक कटिबद्धता यामुळे त्यांनी नकार दिला".

पुढे त्यांनी सांगितलं की "नाटू नाटू गाण्यासाठी दोन महिने मेहनत घेण्यात आली होती. वर्कशॉप आणि सराव यासाठी दोन महिने लागले होते. 15 दिवस या गाण्याचं शूटिंग सुरु होतं. ऑस्करमधील गाण्यासाठी लॉस एंजेलिसमधील डान्सर्सनी 18 तास सराव आणि 90 मिनिटांचं कॅमेरा ब्लॉकिंग केलं".

राज कपूर हे दिल्लीचे असून कॅनडात वाढले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते अकॅडमीशी जोडलेले आहेत. गायक काल भैरव आणि राहुल यांच्यासोबत 'नाटू नाटू' लाइव्ह परफॉर्मन्ससाठी RRR च्या क्रिएटिव्ह टीमसोबत त्यांनी काम केलं.

एसएस राजामौली, त्यांची पत्नी रमा राजामौली, राम चरण आणि त्याची पत्नी उपासना, ज्युनियर एनटीआर, एमएम कीरावानी आणि त्यांची पत्नी श्री वल्ली, गीतकार चंद्रबोस, नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षित, एसएस कार्तिकेय आणि त्यांच्या पत्नीने ऑस्कर २०२३ मध्ये टीम 'आरआरआर'चे प्रतिनिधित्व केले.