पाकिस्तानच्या सुपरहिट अभिनेत्रीकडून काजोलची कॉपी, व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानी स्टार्स हे हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे चाहते आहेत. 

Updated: Aug 17, 2022, 12:11 AM IST
पाकिस्तानच्या सुपरहिट अभिनेत्रीकडून काजोलची कॉपी, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : पाकिस्तानी स्टार्स हे हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे चाहते आहेत. हे अनेकदा समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील संघर्षामुळे आता पाकिस्तानी स्टार्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्याआधीही अनेक पाकिस्तानी स्टार्स आहेत ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत हात आजमावला आहे. पाकिस्तानी मालिकांमध्ये आजही बॉलिवूड चित्रपटांची गाणी ऐकायला मिळतात. इतकंच नाही तर अनेक स्टार्स हिंदी गाणी आणि डायलॉग्सवर फनी रील्सही बनवतात.

अलीकडेच पाकिस्तानी प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिरनेही तिच्या इंस्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री काजोलची नक्कल करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हानिया खूपच क्यूट दिसत आहे. लोकं तिची ही स्टाईल पाहून तिची खूप स्तुती करत आहेत.  

हानियाने काजोलची नक्कल कशी केली?
खरंतर, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक रील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती काजोल आणि शाहरुख खानचा सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है' चा डायलॉग रिक्रिएट करताना दिसत आहे. तुम्ही 'कुछ कुछ होता है' पाहिला असेल. तर तुम्हाला तिचा 'राहुल अंजलीची फाइट' हा आयकॉनिक सीन आठवेल. हानियाने हाच सीन रिक्रिएट केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या हेअरस्टायलिस्टसोबत हेअरस्टाईल करताना दिसत आहे. पाकिस्तानी अभिनेत्रीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे आणि लोकं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.