'पाकिस्तानी कलाकारांकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध का नाही?'

बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी पाकिस्तानी कलाकारांना खडेबोल सुनावले आहेत. 

Updated: Mar 3, 2019, 11:05 AM IST
'पाकिस्तानी कलाकारांकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध का नाही?' title=

मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वायुदलाकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईचे जनसामान्यांपासून बॉलिवूड मंडळीचे वक्तव्य समोर येत आहेत. सोशल मीडिच्या माध्यमातून ते आपले मत व्यक्त करत आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी पाकिस्तानी कलाकारांना खडेबोल सुनावले आहेत. आमच्याच देशात राहून, प्रसिद्धी मिळवून सुद्धा पाकिस्तानी कलाकारांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याची निंदा केली नाही. पाकिस्तानी कलाकारांनी माणुसकीचे नाते लक्षात घेवून सोशल माध्यमातून ह्ल्ल्याची निंदा करायला हवी असल्याची भावना भांडारकर यांनी व्यक्त केली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील घृणास्पद संबंधांमुळे आज दोन्ही देशांच्या कलाकारांमध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहेत. भारतीय अभिनेत्री स्वरा भास्कर अणि पाकिस्तानी कलाकार वीणा मलीक यांच्यात विवाद सुरू आहे. वीणाने भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 'आताच आले आहेत, पाहुणचार घेऊन जा' असे टि्वट तिने केले.

 

तिच्या या पोस्ट नंतर स्वरा तिच्यावर चांगलीच बरसली. स्वरा म्हणाली, ' वीणा तुझ्या अशा घाणेरड्या विचारांवर तुला स्वत:ला लाज वाटयला हवी. तुझा उत्साह एक क्षण आहे. आमचा जवान एक शूर वीर आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आणि आत्मविश्वास आहे.'

 

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची एफ १६ विमाने पिटाळून लावली. त्याचवेळी भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. हे मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. शूक्रवारी रात्री भारतीय वैमानिक भारतात दाखल झाले.