Salman Khan असेल त्या सेटवर मुलींच्या कपड्यांसाठी नियम- अटी लागू; पलक तिवारीचा मोठा खुलासा

Salman Khan Has A Rule For women Working on his set : पलक तिवारी ही श्वेता तिवारीची लेक असून तिनं सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाआधी अंतिम या चित्रपटामध्ये असिस्टंट म्हणून काम केले होतं. त्यानंतर तिला आता सलमानसोबत मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 13, 2023, 11:03 AM IST
Salman Khan असेल त्या सेटवर मुलींच्या कपड्यांसाठी नियम- अटी लागू; पलक तिवारीचा मोठा खुलासा title=
(Photo Credit : ANI Twitter)

Palak Tiwari On Salman Khan Has A Rule For women Working on his set :बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Pakal Tiwari) देखील दिसत आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या एका मुलाखतीत पलकनं सलमानसोबत काम करण्याचा तिला आलेला अनुभव सांगितला आहे. तर यावेळी पलकनं खुलासा केला की सलमानच्या सेटवर मुलींना त्यांच्या कपड्यांवरून काही नियम असतात. सेटवर मुली रिव्हिलींग कपडे परिधान करू शकत नाही. 

पलकनं सिद्धार्थ कन्नन या युट्यूबरला एक मुलाखत दिली होती. यावेळी पलकनं चित्रपट काम करण्याचा त्याचा अनुभव सांगितला. 'मी सलमान खानच्या अंतिम या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर होते. मला वाटलं अनेकांना ही गोष्ट माहित नसेल पण, सलमान सरांच्या सेटवर मुलींसाठी एक नियम असतो, तो म्हणजे माझ्यासेटवर मुलींची नेकलाइन (पलकनं इशारा केला) इथं पर्यंत असली पाहिजे. मुलीचं शरीर हे झाकलेलं हवं. त्यामुळे जेव्हा माझ्या आईनं मला शर्ट आणि जॉगरमध्ये सेटवर जाताना पाहिले, ज्यात मी माझं शरीर हे झाकलेलं होतं. तेव्हा तिनं मला विचारलं की कुठे जातेस? तू कशी चांगली ड्रेसअप आहेस?' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे याविषयी आईला सांगत पलक म्हणाली, 'सलमान सरांच्या सेटवर जाते. माझ्या आईला आनंद झाला. त्यावर तिनं मला पुढे प्रश्न विचारला की असा नियम का? तेव्हा मी सांगितलं की ते ट्रेडिशन्ल आहे. ते म्हणतात तुम्हाला जसे कपडे परिधान करायचे आहेत तसे करा. पण त्यासोबत त्यांच्यासोबत काम करत असलेल्या मुली सुरक्षित रहायला हव्या असं त्यांना वाटतं. आपल्या आजुबाजूला असलेल्या पुरुषांना आपण पर्सनली ओळखत नसतो, त्यामुळे ती जागा ही पर्सनल स्पेस नसते आणि तिथे त्या सगळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही... त्यामुळे स्त्रीया सुरक्षित असायला हव्या म्हणून त्यांनी हा नियम काढला आहे.' 

हेही वाचा : सलमानच्या Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!

पुढे पलकनं तिच्या आईला जेव्हा कळलं की तिला सलमान खानच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा तिला काय वाटलं होतं. 'माझी आई खूप शांत होती. कारण तिला माहित होतं की मी सलमान सरांच्या सेटवर आहे. कारण प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलीनं कसे कपडे परिधान करायला हवे. प्रत्येक आईप्रमाणे माझीही आई तशीच आहे.' 

दरम्यान, सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या निमित्तानं 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, दाक्षिणात्य सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल महत्त्वाच्या भूमिकेत आहे.