चालू व्हिडिओमध्येच अभिनेत्रीने काढलं जॅकेट,आणि मग...

हा व्हिडिओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे

Updated: Sep 4, 2021, 07:08 PM IST
चालू व्हिडिओमध्येच अभिनेत्रीने काढलं जॅकेट,आणि मग... title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आणि बॉलिवूडचा नवोदित अभिनेत्री पलक तिवारी तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. तिच्या चाहत्यांचं कनेक्शन कायम ठेवण्यासाठी ती सतत प्रयत्न करत राहते. आता तिने तिच्या ताज्या फोटोशूटचा एक मेकिंग व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांना अतिशय ग्लॅमरस पद्धतीने घायाळ करत आहे.

जॅकेट उतरवून दाखवली स्टाईल
आता पलक तिवारीने अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती सतत कॅमेरासमोर पोझ देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिने जॅकेट आणि ट्राऊजरसह स्टाईलिश शॉर्ट टॉप घातला आहे. व्हिडिओच्या मध्यभागी, तिने तिचं जॅकेट काढून तिच्या खांद्यावर लटकवलं. तिच्या चाहत्यांना तिची ही स्टाईल खूप आवडली आहे. 

पहा हा VIDEO ...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या या पोस्टला भरभरून दाद मिळत आहे. पलक तिवारीचं सोशल मीडियावर खूप मोठे फॅन फॉलोइंग आहे आणि याच कारणामुळे तिच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. पलक तिवारीच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

डेब्यू चित्रपटातून मिळाली प्रशंसा 
पलक तिवारीचा पहिला चित्रपट 'रोझी - द केसर चॅप्टर' गेल्या महिन्यात रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केलं आहे. तर विवेक ओबेरॉय, प्रेरणा व्ही अरोरा यांनी निर्मिती केली आहे. पलक तिवारीसोबत विवेक ओबेरॉय देखील या चित्रपटात दिसला होता. पलक तिवारी श्वेता तिवारी आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे.