प्रसिद्ध गायकाचा अपघातात निधन; म्यूझिक इंडस्ट्रीला मोठा धक्का

गायकाचा अपघात झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.   

Updated: Mar 30, 2021, 02:13 PM IST
प्रसिद्ध गायकाचा अपघातात निधन; म्यूझिक इंडस्ट्रीला मोठा धक्का  title=

मुंबई : पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजान (Diljan)च्या निधनाने समस्त म्यूझिक इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. शिवाय त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. समोर आलेल्या महितीनूसार दिलजानचा कार अपघातात मृत्यू झाल्याचं कळत आहे. सकाळी जवळपास 3.45 वाजेच्या सुमाराच ही दुर्घटना घडली. दिलजानच्या अपघाताची बातमी समोर येताच म्यूझीक इंडस्ट्रीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. 

 

दिलजान कारमधून अमृतसरहून कतारपूरच्या दिशेने  जात  असताना हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. कतारपूरच्या दिशेने जात असताना रस्त्यात जंडियाला गुरू याठिकाणी कार डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाला आहे. ज्यामुळे दिलजान जागीच ठार झाला. 

दिलजानच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. सर्वात धक्कादायक गोष्य म्हणजे दिलजानचा एक व्हिडिओ 2 एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार होता.