पंकज त्रिपाठींकडून 'पत्नी'विषयी मोठा खुलासा, म्हणाले...

पंकज यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Nov 4, 2022, 11:09 AM IST
पंकज त्रिपाठींकडून 'पत्नी'विषयी मोठा खुलासा, म्हणाले... title=

मुंबई : अभिनेता किंवा अभिनेत्री होण्याचे स्वप्न अनेक लोक पाहतात. पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. दरम्यान, सध्या एका अभिनेत्रीनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे ती म्हणजे खुशबू अत्रे. (Khushboo Atre) खुशबू सध्या 'क्रिमिनल जस्टिस' या वेब सीरिजमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi ) यांच्या पत्नी रत्नाची भूमिका साकारत आहे. इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव खुशबूनं एका मुलाखतीत सांगितला. यावेळी पंकज त्रिपाठी यांनी त्यांची ऑनस्क्रिन पत्नी खुशबू विषयी अनेक मोठे खुलासे केले आहेत. 

क्रिमिनल जस्टिसच्या पहिल्या सीजनमध्ये पंकज हे बॅचलर होते आणि त्यांच विस्कळती असं घर पाहण्याची प्रेक्षकांना सवय झाली होती. मात्र, दुसऱ्या सीझनमध्ये पंकज अचानक लग्न करतात आणि त्यांची पत्नी मुंबईत येते. हे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. त्यानंतर गावातून आलेली रत्ना कशा प्रकारे शहरातील लोकांमध्ये मिक्स होते आणि माधव मिश्रासोबत तिचं रिलेशन एका नव्या ट्रॅकवर जातं हे पाहून चाहत्यांना आनंद झाला. खुशबूचा अभिनय पंकज यांना प्रचंड आवडला होता. 

काय म्हणाले पंकज त्रिपाठी

यावेळी पंकज यांनी खुशबू विषयी काही आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत. पंकज म्हणाले, खुशबू एक अप्रतिम अभिनेत्री आहे. खुशबू इंदोरची असून ती केवळ अभिनेत्री नाही तर 20-25 प्रकारचे वेगवेगळे आवाजही काढते. ती कार्टून शोमध्ये मुलांचे आवाज डब करते आणि एक उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. (Pankaj Tripathi said such a thing about Wife fans will be shocked) 

पंकज त्रिपाठी यांच्याकडून मिळालेल्या कौतुकानं खुश असलेल्या खुशबू म्हणाली की, 'क्रिमिनल जस्टिस हा माझ्या अभिनयातील करिअर सर्वोत्तम अनुभवांपैकी एक आहे. मला आठवतंय जेव्हा मला फोन आला तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की मी पंकज सरांसोबत अभिनय करताना दिसेल. स्क्रिप्ट रीडिंगच्या वेळी आम्ही भेटलो तेव्हा ती वेळ सगळ्यात सुंदर होती कारण त्याची सुरुवात याहून चांगली होऊ शकली नसती. रत्ना या भूमिकेनं माझ्या करिअरला पुढे नेलं. 
 
दरम्यान, यापूर्वी खुशबूनं 'राझी', 'अवैध', 'शमिताभ', 'वोदका डायरीज' आणि टीव्ही शो 'उडान', 'साथ निभाना साथिया' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. सध्या दोन बॉलिवूड चित्रपटांसाठी शूटिंग करत आहे.