सायना सिनेमासाठी परिणितीने घेतली एवढी मेहनत? वाढवलं चक्क एवढं वजन

अभिनेत्री परिणीती चोप्राचा 'सायना' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमासाठी तिचं खूप कौतुक केलं जात आहे

Updated: Mar 26, 2021, 10:52 PM IST
सायना सिनेमासाठी परिणितीने घेतली एवढी मेहनत? वाढवलं चक्क एवढं वजन title=

मुंबई : नुकताच अभिनेत्री परिणीती चोप्राचा 'सायना' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमासाठी तिचं खूप कौतुक केले जात आहे. एका मुलाखती दरम्यान तिने शरीराबाहेर केलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नुकताच परिणीती चोप्राचा 'द गर्ल ऑन द' ट्रेन सिनेमातदेखील दिसली होती. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. परिणीती चोप्रा तिच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.

एका मुलाखतीत तिने आपल्या शरीरातील लाजिरवाणीपणाबद्दल आणि वाढीव वजनावर भाष्य केलं आहे. लोक जेव्हा तिला या गोष्टीसाठी चिडवयाचे तेव्हा तिला कसं वाटते हे तिने सांगितलं आहे.परिणीती एका मुलाखतीमध्ये म्हणाली, 'मी छान दिसत नव्हते आणि मी काहीच करु शकत नव्हती

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

परिणीती चोप्रा पुढे म्हणाली,'मी चांगली दिसत न्हवते. आणि  मी काही वेगळं केलं असतं आणि तरीही लोकांनी मला प्रतिसाद दिला नसता तर मी जास्त दुखवली गेली असते, पण मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत होते. मी आरोग्याकडे लक्ष देत होते आणि मला ते माहित होतं 6 महिने किंवा मी एका वर्षात मी पुन्हा पहिल्यासारखी होईन.

बॉडी शेमिंगवर प्रतिक्रिया व्यक्त करत ती म्हणाली, 'ही पृथ्वीवरील सर्वात मूर्खपणाची गोष्ट आहे. ईथे असं आहे की, जर कोणाचे डोळे काळे असतील तर त्यांना त्रास द्यायचा'. परिणिती पुढे म्हणाली समस्या अशी आहे की, लोक स्वत: ची लोकांशी तुलना करतात. आपल्याला फक्त फिट राहणं आवश्यक आहे.

परिणीती चोप्रा असंही म्हणाली की, तिच्यावर जे नकारात्मक प्रतिक्रिया करतात ते लोक आयुष्यात अडचणीत येतात. परिणीती चोप्रा सायना या सिनेमात सायना या मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाशिवाय ती एका अ‍ॅनिमल फिल्ममध्येही दिसणार आहे. या सिनेमांत रणबीर कपूर आणि अनिल कपूरसुद्धा एका महत्वाच्या भूमिकेत आहेत.