होळीच्या आधीच फॅन्सने दिलं भाईजानला सरप्राईज, फॅन्सने बनवलेला 'राधे'चा ट्रेलर व्हायरल

या ट्रेलरमध्ये सलमान खानच्या वेगवेगळ्या झलक दाखवण्यात आल्या आहेत

Updated: Mar 26, 2021, 09:35 PM IST
होळीच्या आधीच फॅन्सने दिलं भाईजानला सरप्राईज, फॅन्सने बनवलेला 'राधे'चा ट्रेलर व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा यावर्षी रिलीज होणाऱ्या चित्रपटांपैकी 'राधे: यू आर मोस्ट वॉन्टेड भाई'  हा सिनेमा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे. काही दिवसांपूर्वी भाईजानने हा सिनेमा प्रदर्शित करण्याची घोषणा केली. एका वृत्तानुसार, निर्माते आणि सिनेमाची टीम सिनेमाच्या टीझरपेक्षा ट्रेलर रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी युट्यूबवर सलमान खानच्या चाहत्यांनी बनवलेला राधे सिनेमाचा ट्रेलर तुफान व्हायरल होत आहे

या ट्रेलरमध्ये सलमान खानच्या वेगवेगळ्या झलक दाखवण्यात आल्या आहेत. व्हिडिओला यूट्यूबवर आतापर्यंत 2.5 मिलीयन जास्त व्हूज मिळाले आहेत. बरेच लोक यूट्यूबवर कमेंटद्वारे या फॅनने बनवलेल्या ट्रेलरचं कौतुक करत आहेत.

सलमान खानच्या 'राधे' या सिनेमात रणदीप हूडा आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसतील. 'भारत' सिनेमानंतर हा दुसरा सिनेमा असेल ज्यामध्ये सलमान खान आणि दिशा पाटनीची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केलं आहे. यंदाच्या ईदच्या मूहुर्तावर म्हणजेच 13 मे रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी ईदच्या मूहुर्तावर प्रदर्शित होणार होता पण कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे हा सिनेमा पुढे ढकलला गेला.

'राधे' शिवाय सलमान खाननं 'टायगर 3' या सिनेमाच्या शूटिंगची तयारी सुरू केली आहे. या सिनेमात भाईजान पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत ऑनस्क्रीनवर रोमान्स करताना दिसणार आहे. एका वृत्तानुसार, सलमान खानने शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचं वेळापत्रकही पूर्ण केलं आहे.