सीबीएसई निकालात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची बाजी

सीबीएसई बोर्डाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे.

Updated: Jul 30, 2021, 09:14 PM IST
सीबीएसई निकालात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची बाजी

मुंबई : सीबीएसई बोर्डाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अशनूर कौरचा निकाल लागला आहे. अशनूर या वर्षी बारावीत होती, त्यामुळे अभिनेत्री तिच्या निकालावर खूप खूश आहे. अशनूरनेही काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, सध्या ती केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत आहे.

अशा परिस्थितीत अशनूरला तिच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळालं आहे. सोनी टीव्हीचा प्रसिद्ध शो 'पटियाला बेब्स' मध्ये मिनीच्या भूमिकेत दिसलेल्या अशनूर कौरने 12 वीत 94% गुण मिळवले आहेत. या शानदार टक्केवारीने अभिनेत्री खूप खुश आहे.

अभिनेत्रीने काय म्हटलं आहे ते जाणून घ्या
निकालानंतर एका मुलाखतीमध्ये बोलताना अशनूर कौर म्हणाली की, सध्या तिला खूप चांगलं वाटत आहे. मी दहावीमध्येही चांगली टक्केवारी मिळविली होती. त्यामुळे मला फक्त बारावीत त्यापेक्षा जास्त गुण मिळवायचे होते. म्हणूनच मी या दरम्यान कोणत्याही नवीन प्रोजेक्टवर स्वाक्षरी केली नाही. कारण मला पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं. आता शेवटी त्याचं फळ मला मिळालं आहे.

याचबरोबर अशनूरने म्हटलं आहे की, मला बीएमएम कोर्स करायचा आहे. आत्तापर्यंत मला असा विचार आला आहे. की, मी माझ्या पदव्युत्तर अभ्यासासाठी परदेशात जायचं आहे. मात्र, अभिनयाशिवाय मला चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन देखील शिकायचं आहे. नुकतंच अशनूरने तिचं मुंबईतलं नवीन घर खरेदी केलं आहे. या संदर्भात अभिनेत्रीने म्हटलं आहे की, तिने आता तिच्या स्वप्नांचे घर विकत घेतलं आहे.

अशनूर कौरच्या कारकीर्दीबद्दल बोलायंच झालं तर, तिने वयाच्या केवळ वयाच्या 5व्या वर्षी अभिनय करण्यास सुरवात केली. 2009 मध्ये, अशनूर प्रसिद्ध टीव्ही शो 'झांसी की रानी', नंतर 'साथ निभाना साथिया', 'ना बोले तुम ना मैने कुछ कह', 'बडे अच्छे लगते हैं', 'देवों के देव महादेव' आणि ' ये रिश्ता '.' क्या कहलाता है 'सारखे टीव्ही शो केले. त्याचबरोबर या वर्षी ती तीन म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली आहे.