पवनदीप - अरुणिता अडकले विवाहबंधनात?

पवनदीप - अरुणिता दोघांचे नव्या जोडप्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

Updated: Oct 7, 2021, 08:55 AM IST
पवनदीप - अरुणिता अडकले विवाहबंधनात?  title=

मुंबई : अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांनी त्यांच्या गोड आवाजाने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध केलं. पण त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा जोरदार रंगलेली असते. 'इंडियन आयडल' शो संपल्यानंतर देखील त्यांच्या त्यांची चर्चा कायम रंगलेली असते. आता देखील अरुणिता आणि पवनदीप पुन्हा चर्चेत आले आहेत. आता रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील तसंच आहे. सध्या अरुणिता आणि पवनदीपचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल होत अलसलेल्या व्हिडिओमध्ये दोघे नव्या जोडप्याप्रमाणे दिसत आहे. 

फोटोमध्ये अरुणिता लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये तर पवनदीप शेरवानीमध्ये दिसत आहे. दोघांच्या या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेन्ट येत आहेत. काही चाहत्यांनी पवनदीप आणि अरुणिताला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी मात्र एडिंटींग उत्तम प्रकारे केली असल्याचं म्हटलं आहे. तर अरुणिता आणि पवनदीपच्या चाहत्यांनी खरंच लग्न करणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान या फोटोवर अरुणिता आणि पवनदीपने याबाब कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. दोघांबद्दल सांगायचं झालं तर, दोघांची ओळख 'इंडियन आयडल' शोच्या माध्यमातून झाली. तेव्हा त्यांच्या लव्ह एन्गलची चर्चा रंगली. आता शो संपला असूनही दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दोघे कायम चर्चेत असतात.