PHOTO: Ex Husband अनुराग कश्यपसोबत काल्कीने ऎकल्या Mixed Tapes

अशीही वेळ आली की, वेगळे झालेले काल्की आणि अनुराग पुन्हा एकदा समोरासमोर आले. इतकेच नाहीतर त्यांची त्याचे फोटो सोशल मीडियातही शेअर केले.

Updated: Dec 7, 2017, 10:36 PM IST
PHOTO: Ex Husband अनुराग कश्यपसोबत काल्कीने ऎकल्या Mixed Tapes title=

मुंबई : अशीही वेळ आली की, वेगळे झालेले काल्की आणि अनुराग पुन्हा एकदा समोरासमोर आले. इतकेच नाहीतर त्यांची त्याचे फोटो सोशल मीडियातही शेअर केले. ही जोडी ‘टेप कास्ट’ या शोमध्ये दिसणार आहेत. या शोच्या शूटिंगसाठीच हे दोघे एक्स नवरा-बायको एकत्र आले होते.

Photo: When Kalki Koechlin played mixed tapes with ex-husband Anurag Kashyap

आपल्या एक्स पतीसोबत भेटल्यावर काल्कीने सोशल मीडियात फोटो शेअर केलाय. काल्कीने अनुरागसोबतचा हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘हे प्रत्येक दिवशी होत नाही. तुम्हाला देवाचा आवाज ऎकण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमच्या एक्ससोबत बसून मिक्स्ड टेप वाजवाल’.

Photo: When Kalki Koechlin played mixed tapes with ex-husband Anurag Kashyap

काल्की आणि अनुरागने सोबत अनेक सिनेमे केले आणि एक वेळ अशी होती की, काल्की अनुरागच्या प्रत्येक सिनेमात हिरोईन होती. ‘देव डी, ‘ए गर्ल इन येलो बूट’ सारख्या सिनेमात तिने काम केलं. 

Photo: When Kalki Koechlin played mixed tapes with ex-husband Anurag Kashyap

घटस्फोटानंतर एका मुलाखतीत अनुराग म्हणाला होता की, ‘काल्की खूप चांगली अभिनेत्री आहे. जे काही आमच्यात झालं...आम्ही वेगळे का झालोत....ते केवळ आमच्यातच राहिल. पण त्याने मला तिच्या जीवनातील सहा वर्षे दिली आहेत. माझ्या मनात तिच्यासाठी नेहमीच सन्मान राहिल. तिने माझं जीवन बदललं आहे. इतकेच काय तर तिने मला सोडलं ते माझ्या कमींमुळे...मी नात्यांबाबत चांगला नाहीये’.

Photo: When Kalki Koechlin played mixed tapes with ex-husband Anurag Kashyap

Photo: When Kalki Koechlin played mixed tapes with ex-husband Anurag Kashyap

रिपोर्टनुसार काल्की आणि अनुरागने ‘देव डी’ सिनेमावेळी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. नंतर दोघांनी २०११ मध्ये लग्न केलं. त्यानंतर दोघांनी २०१४ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि २०१५ मध्ये ते अधिकृतपणे वेगळे झाले’.