Kho Kho World Cup: पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! बघा कोणता संघ कधी कोणाशी भिडणार

Kho-Kho World Cup 2025: जगभरातील ३९ संघ या स्पर्धेत खोळणार असून, ही स्पर्धा खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 8, 2025, 08:18 AM IST
Kho Kho World Cup: पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! बघा कोणता संघ कधी कोणाशी भिडणार  title=

Kho Kho World Cup 2025: १३ ते १९ जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावर पहिल्या वहिला खो-खो विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत जगभरातील ३९ संघ सहभागी होणार आहेत.  या स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात सामने होणार असून, सर्व चाहत्यांना हे सामने पहायला मिळणार आहेत.   ही स्पर्धा खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

पहिला सामना कोणता? 

खो-खो विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन सोहळा १३ जानेवारी २०२५ रोजी इंदिरा गांधी मैदानावर पार पडणार आहे. भारत विरुद्ध नेपाळ (India-Nepal) असा पहिला उदघाटनाचा सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सामने सुरु होती. पहिल्या सामन्यात भारताची गाठ नेपाळशी पडणार आहे. साखळी सामने १६ जानेवारीस संपतील.  त्यानंतर १७ जानेवारीपासून प्लेऑफ फेरी सुरू होईल. पुरुषांची अंतिम लढत १९ जानेवारी रोजी रात्री ८.१५ वाजता होईल. या लढतीने स्पर्धेचा  रोमहर्षक समारोप होईल. महिलांचा सलामीचा सामना १४ जानेवारीस सकाळी ११.४५ वाजता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळविण्यात येईल. भारतीय महिला संघाचा पहिला सामना १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता दक्षिण कोरियाशी होईल. महिला गटाचेही साखळी सामने १६ जानेवारीस संपतील. १७ जानेवारीस प्लेऑफ लढती होईल. महिला अंतिम सामना १९ जानेवारीस संध्याकाळी ७ वाजता खेळविण्यात येईल. 

हे ही वाचा: घटस्फोटाच्या अफवांदरम्यान मिस्ट्री गर्लसोबत दिसला युजवेंद्र चहल, तोंड लपवत जातानाचा Video Viral

 

कुठे बघता येतील सामने? 

स्टार स्पोर्ट्सवरून हे सामने स्टार स्पोर्ट्स १ एचडी आणि स्टार स्पोर्ट्स फर्स्ट या वाहिनीवरून थेट प्रसारित करण्यात येणार आहेत. दूरदर्शनवरूनही या सामन्यांचे थेट प्रसारण दाखवण्यात येईल. त्याचवेळी डिस्ने हॉटस्टार या ओटीटीवरुनही सामने बघायला मिळणार आहेत. 

हे ही वाचा: Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ!

 

पुरुष वर्ग : गटवारी आणि सामने

पुरुषांच्या स्पर्धेमध्ये २० संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. 

  • अ गट : भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
  • ब गट: दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड, इराण
  • क गट: बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड
  • ड गट: इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया

हे ही वाचा: 'माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला!

महिला वर्ग : गटवारी आणि सामने

महिला विभागात पुरुषांच्या स्वरूपाचे प्रतिबिंब दिसून येईल. महिला विभागात १९ संघांना चार गटात विभागण्यात आले आहे. 

  • अ गट : भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया
  • ब गट: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड
  • क गट: नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
  • ड गट: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया