close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO: ट्विंकलच्या ट्विटवरुन नरेंद्र मोदींनी घेतली अक्षयची फिरकी...

'माझ्यामुळेच तुमच्या दोघांमध्ये भांडण होत नसेल कारण...'

Updated: Apr 24, 2019, 02:04 PM IST
VIDEO: ट्विंकलच्या ट्विटवरुन नरेंद्र मोदींनी घेतली अक्षयची फिरकी...

नवी दिल्ली : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अनेक गोष्टींवर चर्चा करण्यात आली. अक्षयने सोशल मीडियाबबात मोदींशी चर्चा केली त्यावर त्यांचं उत्तर अतिशय आश्चर्यचकित करणारं होतं. सोशल मीडियाबाबत अक्षयच्या प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते अक्षयचं ट्विटर तर तपासतातच शिवाय अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाच्याही ट्विटर अकाउंटवर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

Modi with Akshay

सोशल मीडियावरील ट्विटरवर चर्चा करताना मोदींनी अक्षय - ट्विंकल यांच्यात भांडण, वाद-विवाद न होण्याचं कारणही स्वत:चं सांगितलं आहे. 'मी अक्षयसह ट्विंकल खन्नाचंही ट्विटर पाहत असतो. मला असं वाटतं माझ्यामुळेच तुमच्या दोघांमध्ये भांडण होत नसेल कारण, ट्विकल भांडणाचा संपूर्ण राग ट्विटरवरुन माझ्यावरच काढत असते. माझ्यामुळे तुमच्या घरात कौटुंबिक शांती राहत असेल.' असं मोदींनी उत्तर दिलं. अक्षयच्या सोशल मीडियाच्या प्रश्नावर देशाचे पंतप्रधान असं काही मजेशीर उत्तर देतील असं अपेक्षित नसल्याने अक्षयला हसू आवरलं नाही. 

क्'€à¤¯à¤¾ PM मोदी को गुस्'€à¤¸à¤¾ आता है? उसको किस पर निकालते हैं? अक्षय के सवाल पर PM का पढ़े जवाब

मुलाखतीच्या एक दिवस आधी अक्षयने ट्विटरवरुन 'मी असं काही अनोखं करणार आहे, जे मी याआधी कधीही केलं नाही' असं ट्विट केलं होतं. 'देशात दररोज निवडणूका आणि राजकारणाविषयी चर्चा होत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणारी मुलाखत निवडणूकीच्या काळात वातावरण शांत, हलकं करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह निष्पक्ष आणि पूर्णपणे अराजकीय चर्चा करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान वाटत असल्याचं' अक्षयने म्हटलं आहे.