'भारताला अभिमान आहे की...', मोदींनी पोस्ट केला 'त्या' चौघींचा फोटो; छाया कदम यांचाही समावेश

Chhaya Kadam : छाया कदम आणि त्या तिघींचा फोटो शेअर करत नरेंद्र मोदी म्हणाले, 'भारताला अभिमान आहे की...'

दिक्षा पाटील | Updated: May 26, 2024, 05:30 PM IST
'भारताला अभिमान आहे की...', मोदींनी पोस्ट केला 'त्या' चौघींचा फोटो; छाया कदम यांचाही समावेश title=
(Photo Credit : Social Media)

Chhaya Kadam : कान्स फिल्म फेस्टिवल 2024 ची सध्या चर्चेत आहे. या फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शिका पायल कपाडियानं इतिहास रचला आहे. पायलनं ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ साठी ग्रॅंड प्रिक्सचा खिताब तिच्या नावी करुन घेतला आहे. या चित्रपटानं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या दुसरा सगळ्यात मोठा अवॉर्ड ग्रॅंड प्रिक्स जिंकला आहे. त्यानंतर सगळीकडे पायलची स्तुती करण्यात आली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पोस्ट शेअर करत तिची स्तुती केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच्या ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदी म्हणाले की 'भारताला अभिमान आहे की, पायल कपाडिया यांनी देशाला 77व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ च्या म्थ्यमातून ग्रॅंड प्रिक्स मिळवून दिला. त्या एफडीआयआयच्या माजी विद्यार्थ्यीनी आहेत. त्यांचं कौशल्य जागतिक स्तरावर सगळ्यांना पाहायला मिळालं. या इतक्या मोठा प्रतिष्ठित पुरस्कारानं फक्त त्यांच्या कौशल्यांचाच सन्मान झाला नसून याधून भारतातील चित्रपट निर्मात्यांच्या नवीन पिढीलाही यातून प्रेरणा मिळेल.'

कोणत्याही चित्रपटाला कान्समध्ये ग्रॅंड प्रिक्स हा पुरस्कार मिळणं खूप मोठी गोष्ट आहे आणि पायल केलेल्या या कामाची पंतप्रधानांशिवाय बॉलिवूडनं देखील दखल घेतली आहे. भूमी पेडनेकर, कियारा आडावाणी, ऋचा चड्ढा आणि वरुण ग्रोवर यांनी देखील पायलचे कौतुक केले आहे. त्यांनी पायल आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे पटकथा? 

चित्रपटाच्या पटकथेविषयी बोलायचे झाले तर त्यात प्रभा आणि अनु नावाच्या दोन नर्सची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्या दोघी मल्याळम असतात आणि मुंबईत राहतात. त्या दोघी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये स्ट्रगल करत असताता. त्यासोबत चित्रपटात पार्वती नावाची एक महिला आणि तिची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तर या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम देखील दिसल्या. छाया कदम यांना चित्रपटात पाहून सगळ्यांना आनंद झाला तर त्यांच्या अभिनयाचे देखील कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्यांचं आयुष्य हे इतरांची मदत करण्यात जातं आणि त्या बदल्यात त्यांना काय मिळतं? काही पैसे आणि स्वातंत्र्य आणि स्तुती... पण इथे गोष्ट महिलांच्या हक्काची आहे. फेमिनिस्ट विचारांना पाठिंबा देण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आला आहे. तर या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.