श्रीदेवी मृत्यू प्रकरणात नातेवाईक आणि हॉटेल स्टाफची चौकशी

अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईमध्ये निधन झालं. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी दुबई पोलीस प्रत्येक गोष्ट तपासत आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 27, 2018, 10:45 AM IST
श्रीदेवी मृत्यू प्रकरणात नातेवाईक आणि हॉटेल स्टाफची चौकशी title=

दुबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईमध्ये निधन झालं. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी दुबई पोलीस प्रत्येक गोष्ट तपासत आहे.

रूम नंबर 2201 सील

सोमवारी पोलिसांनी या संबंधात श्रीदेवी यांच्या कुटुंबियांची आणि हॉटेलमधील स्टाफची चौकशी केली. श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गुड उलगडण्यासाठी पोलीस संपूर्ण घटना आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी तपासत आहे. एमिरेट्स टॉवरमधील रूम नंबर 2201 मध्ये कशा प्रकारे त्यांचं पार्थिव मिळालं हे पोलीस तपासत आहे.

पोलिसांकडून चौकशी

पोलिसांनी श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांच्यासह नातेवाईकांची देखील चौकशी केली. जे त्यांच्यासोबत दुबईमध्ये होते. जोपर्यंत पोलीस चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत श्रीदेवी यांचं पार्थिव अल कुसैस मोर्चरीमध्ये ठेवलं जाणार आहे. ज्या रुममध्ये श्रीदेवी थांबल्या होत्या तो रुम पोलिसांनी सील केलं आहे. 

जुन्या रिपोर्ट्सचा ही तपास

भारतातील श्रीदेवी य़ांच्या मेडिकल रेकॉर्ड्सचा देखील तपास केला जात आहे. प्रॉसिक्यूटर कार्यालय श्रीदेवी यांच्या संबंधित सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीदेवी यांनी आतापर्यंत कोणते-कोणते मेडिकल ट्रीटमेंट केल्या आणि कोणत्या सर्जरी केल्या याचा तपास होत आहे. सर्जरीमुळे ही मृत्यू झाला असेल का असा देखील तपास केला जात आहे.

सोमवारपासून विमान उभं

दुबईतील नियमांनुसार मृत्यू प्रमाण-पत्र सर्वात आधी अरबी भाषेत दिलं जातं. त्यानंतर इंग्रजी भाषेत त्याचं भाषांतर केलं जातं. मुंबईमधील कपूर ऑफिसने सोमवारी रात्री अशी माहिती दिली की, श्रीदेवी यांचं पार्थिव मंगळवारी मुंबईला आणलं जाईल. अनिल अंबानी यांचं 13 सीटर विमान  सोमवारपासून दुबई एअरपोर्टवर श्रीदेवी यांचं पार्थिव आणण्यासाठी उभं आहे. सोमवारी 4 वाजेपासून ते तयार ठेवण्यात आलं आहे. पण प्रॉसिक्यूटर ऑफिसकडून श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आणण्याची परवानगी न मिळाल्याने ते भारतात येवू शकलं नाही.