मुंबई : 'मेहेंजोदारो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा हेडगे लवकरचं अभिनेता प्रभाससोबत एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. 'राधे श्याम' चित्रपटाच्या माध्यमातून लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणारी पूजा सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती तिच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
आता तिने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. जो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये पूजा बिकिनी टॉपमध्ये दिसत आहे. फोटोमधील तिच्या अदा अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट आहेत.
तिच्या परफेक्ट फिगरवरून चाहत्यांच्या नजरा हटणार नाहीत, असे फोटो पूजाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र पूजाच्या बिकिनी फोटोंची चर्चा आहे.
पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या पूजा हेगडे 'राधे श्याम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात ती सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ज्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. पण देशातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
'राधे श्याम' चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण निर्माते लवकरचं त्याची नवीन रिलीज डेट जाहीर करतील.
प्रभासच्या अभिनेत्रीचा बिकिनीत बोल्ड लूक, परफेक्ट फिगरवरून चाहत्यांच्या नजर हटेना