सनीनंतर पॉर्नस्टार मिया खलिफाची भारतीय सिनेसृष्टीत एन्ट्री

पॉर्नस्टार सनी लिओनीच्या यशस्वी बॉलिवूड एन्ट्रीनंतर आता अनेक पॉर्नस्टार्नना भारतीय सिनेसृष्टी खुणावत आहे. सनीनंतर आता पॉर्नस्टार मिया खलिफा भारतीय सिनेमा दिसणार आहे.

Updated: Nov 1, 2017, 09:26 AM IST
सनीनंतर पॉर्नस्टार मिया खलिफाची भारतीय सिनेसृष्टीत एन्ट्री title=

मुंबई : पॉर्नस्टार सनी लिओनीच्या यशस्वी बॉलिवूड एन्ट्रीनंतर आता अनेक पॉर्नस्टार्नना भारतीय सिनेसृष्टी खुणावत आहे. सनीनंतर आता पॉर्नस्टार मिया खलिफा भारतीय सिनेमा दिसणार आहे.

‘चन्क्झ २ : द कन्क्ल्युजन’ या मल्ल्याळम सिनेमातून मिया मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणार आहे.‘जिस्म २’ सिनेमातून सनीने २०१२ मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. तिला चांगलंच यश मिळालं. आज ती मोठ्या स्टार्ससोबत सिनेमात दिसत आहे. आता मियाने आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. मियाची मोठी लोकप्रियता पाहता तिच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता नक्कीच राहणार आहे. सध्या मियाने पॉर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकला असून ती पत्रकार म्हणून कार्यरत आहे.

या सिनेमात मिया आयटम साँगसोबतच एक महत्त्वपूर्ण भूमिकाही करणार आहे, असं दिग्दर्शक ओमर लुलू यांनी ‘मनोरमा न्यूज’ला सांगितलं. या सिनेमात मियासोबतच प्रसिद्ध अभिनेत्री हनी रोझही या सिनेमात दिसणार आहे. ‘चन्क्झ २’ हा ‘चन्क्झ’ या ऑगस्टमध्ये रिलीज झालेल्या अॅडल्ट कॉमेडीटाचा सिक्वेल आहे.