मुंबई : 'बाहुबली' या सुपरहीट चित्रपटाने अभिनेता प्रभास खूपच चर्चेत आला आहे.
प्रसिद्धीच्या प्रकाशझोकात आलेला प्रभास आज ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
प्रभासला जगभरातील चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. प्रभासनेही चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभासनेही 'साहो' या त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक चाहत्यांसमोर आणला आहे.
'बाहुबली'तील प्रभासच्या भूमिकेपेक्षा 'साहो' चित्रपटातील लूक फारच वेगळा आहे. प्रभासनेही फेसबुकच्या माध्यमातून हा खास लूक शेअर केला आहे.
'साहो'चा फर्स्ट लूक रिलीज केल्यानंतर काही वेळातळ चाहत्यांनी त्याला झटपट लाईक अअणि शेअर केले आहे. या लूकमध्ये एका मॉर्डन आणि हायटेक शहराला दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे शुटिंग हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये करण्यात आले आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये याकरिता भव्यदिव्य सेट उभारण्यात आला होता. तसेच १०० हून अधिक घोड्यांचा वापर करण्यात आला आहे. सध्या 'साहो'तील अनेक कलाकार घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेत आहे.