'एवढा निर्लजपणा कसा काय करता?' म्हणतं प्राजक्तावर भडकल्या अलक कुबल

आर्याची भूमिका साकारणार वीणा जगताप 

Updated: Nov 3, 2020, 09:05 AM IST
'एवढा निर्लजपणा कसा काय करता?' म्हणतं प्राजक्तावर भडकल्या अलक कुबल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'आई माझी काळुबाई' मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. निर्मात्या आणि काळुबाईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडवर चांगल्याच भडकलेल्या दिसत आहेत. 

या मालिकेतून प्राजक्ता गायकवाडला काढण्यात आलं असून आता तिच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप हिला घेण्यात आलं आहे. प्राजक्ताच्या गैरवर्तणूकीमुळे तिला मालिकेतून काढूण टाकण्यात आलं आहे. हा निर्णय तडकाफडकी घेतलेला नसून बऱ्याचदा प्राजक्ताला सांगूनही तिच्यात कोणताही बदल झाला नाही. यामुळे एवढ्या टोकाचा निर्णय घेण्यात आला. 

प्राजक्ता गायकवाड मालिकेत आर्याची मुख्य भूमिका साकारत होती. मात्र ही भूमिका साकाररत असताना सेटवरील अनेकांना त्रासातून जावं लागत होतं. अलका कुबल यांच्या म्हणण्यानुसार, प्राजक्ता संपूर्ण युनिट तयार असताना तिचा सेट लागलेला असताना चार-चार कधी कधी तर सहा-सहा तास मेकअप रुममधून बाहेर यायची नाही. 

डोकं दुखतं या कारणाने शुटिंग करायची नाही. अनेकदा परीक्षेचं कारण सांगून अचानक सुट्टी घ्यायची. सुपाऱ्यांच्या प्रोग्राममुळे अचानक शुटिंग रद्द करायची. मी काही वर्षांपूर्वी प्राजक्तासोबत काम केलं होतं. प्राजक्ताचं नाव मीच या मालिकेकरता सुचवलं होतं. पण ती तेव्हा अशी नव्हती. या बरोबर तिची आई सेटवर यायची आणि अभिनेत्रीची आई म्हणून त्यांचा एक वेगळाच रुबाब होता. 

या सगळ्याला कंटाळून अनेकदा मालिकेच्या निर्मात्या, दिग्दर्शक, वाहिनीतील संबंधित लोकं या सगळ्यांनी प्राजक्ताला माहिती दिली. मात्र तिच्या वर्तणुकीत कोणताही बदल होत नसल्यामुळे तिला मालिकेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.