पुन्हा एकदा अभिनेत्री प्राजक्ता माळीची आणखी एक नवी पोस्ट चर्चेत, यावेळी मात्र...

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Updated: May 4, 2022, 02:22 PM IST
पुन्हा एकदा अभिनेत्री प्राजक्ता माळीची आणखी एक नवी पोस्ट चर्चेत, यावेळी मात्र... title=

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतीच प्राजक्ता राज ठाकरे यांचे आभार मानताना दिसली. तिची ही पोस्ट काहीवेळातच तुफान व्हायरल झाली. कालचा दिवस प्राजक्तासाठी आणखी एका कारणामुळे आनंदाचा होता. नुकताच प्राजक्ताला  ''कमला रायझिंग स्टार '' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती प्राजक्ताने दिली आहे. 

 हा पुरस्कार प्राजक्ता माळीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ''कमला रायझिंग स्टार'' पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो शेअर करत प्राजक्तानं याबद्दल माहिती दिली आहे. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्राजक्ता माळीनं इन्स्टावर पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की, आणि कालच्या शुभमुहूर्तावर ''मुंबई- राजभवनात'' जाण्याचा योग आला… काल महाराष्ट्राचे राज्यपाल - मा. श्री. भगतसिंग  कोश्यारी  यांच्या हस्ते ''Kamala Rising Star'' पुरस्कार मिळाला..मनापासून धन्यवाद, आयोजन समिती व मा. राज्यपाल. याआधी प्राजक्ताने राज ठाकरे यांचे आभार मानत एक पोस्ट शेअर केली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली की, ''असो, आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे सगळ्याचसाठी. परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं? खूप धन्यवाद''