Prateik Babbar Fall in Love: पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर प्रतीक बब्बर पुन्हा प्रेमात, या अभिनेत्रीला करतोय डेट

 Prateik Babbar Fall in Love: 35 वर्षीय प्रतीक बब्बर याने पहिले लग्न सान्या सागर हिच्या सोबत केले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि नात्यात दुरावा निर्माण झाला, त्यानंतर दोघेही वेगळे आयुष्य जगत आहेत.  

Updated: Aug 27, 2022, 09:24 AM IST
Prateik Babbar Fall in Love: पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर प्रतीक बब्बर पुन्हा प्रेमात, या अभिनेत्रीला करतोय डेट title=

मुंबई : Prateik Babbar Fall in Love: 35 वर्षीय प्रतीक बब्बर याने पहिले लग्न सान्या सागर हिच्या सोबत केले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि नात्यात दुरावा निर्माण झाला, त्यानंतर दोघेही वेगळे आयुष्य जगत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्या आयुष्यात प्रेम फुलले आहे. बातमीनुसार, प्रतिक बब्बर ज्या अभिनेत्रीला आजकाल डेट करत आहे ती 'बार बार देखो' चित्रपटाची अभिनेत्री आहे.

प्रतीकच्या डेटिंगची चर्चा

पिंकविलाच्या वृत्तानुसार, प्रतिक बब्बर ज्या अभिनेत्रीला डेट करत आहे तिचे नाव प्रिया बॅनर्जी आहे. प्रिया 'बार बार देखो' चित्रपटात दिसली आहे. 

कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेट

बातमीनुसार, प्रतीक आणि प्रियाची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार प्रतीक आणि प्रिया जवळपास एक वर्षापासून एकमेकांना ओळखतात. टीव्ही इंडस्ट्रीतील एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली. अशीही बातमी आहे की, प्रतीकने प्रियाच्या घरच्यांना सांगितले आहे. हे दोघे अनेकदा एकमेकांसोबत फिरायला जातात आणि त्यांना एकत्र काम करायचे असते. मात्र, सान्या सागरपासून घटस्फोट घेतल्याने त्याला त्याचे नाते लोकांच्या नजरेपासून लपवायचे आहे. वर्क फ्रंटवर, प्रतीक 'वो लडकी है कहाँ' या चित्रपटात तापसी पन्नू आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत दिसणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prateik babbar (@_prat)

2019 मध्ये सान्या सागरसोबत बोहल्यावर

प्रतीक बब्बर याने 2019 मध्ये सान्या सागर हिच्यासोबत लग्न केले. पण लग्नानंतर वर्षभरातच दोघांमध्ये सतत मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. विशेष म्हणजे लग्नापूर्वी प्रतीकने सान्याला बरेच दिवस डेट केले होते. आता दोघे विभक्त झाले आहेत.